मलायका अरोरा पिते काळे पाणी!

मलायका अरोरा पिते काळे पाणी!

Published on

पुढारी ऑनलाईन : अनेक सेलिब्रिटी सध्या तहान भागवण्याबरोबरच आरोग्यासाठीही साध्या पाण्याऐवजी नवीन प्रकारचे पाणी पीत आहेत. या पाण्याला 'काळे पाणी' असे म्हटले जाते. पूर्वी अंदमानच्या तुरुंगात ठेवायचे असेल तर त्याला 'काळ्या पाण्याची शिक्षा' असे म्हटले जात असे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेससाठी काळे पाणी पित असते.

त्याचा या नव्या 'काळ्या पाण्याशी' थेंबभरही संबंध नाही! हे काळी पाणी म्हणजे 'अल्कलाईन वॉटर' किंवा 'क्षारीय पाणी' असते. त्याची किंमत प्रतिलिटर तीन ते चार हजार रुपये इतकी आहे. त्याची पीएच पातळी सामान्य पेयजलापेक्षा जास्त असते. हे शरीरातील पीएच पातळी नियंत्रित करण्यास आणि कर्करोगासारख्या आजारांशी लढण्यास मदत करते. अल्कलाईन पाण्यातील रेणू लहान असल्याने ते शरीरातील पेशींद्वारे सहज शोषले जातात आणि ते साध्या पाण्यापेक्षा जास्त हायड्रेटिंग असतात.

मलायका अरोरा तिच्या फिटनेसबाबत किती जागरूक असते हे सर्वांनाच ठावूक आहे. ती जिममध्ये घाम गाळून नंतर असे पाणी पित असताना अनेक वेळा दिसून येते. तिच्याशिवाय अनुष्का शर्मा, विराट कोहली, गौरी खान, ऊर्वशी रौतेला, श्रुती हासन यांच्यासारखे अनेक सेलिब्रिटीही असे पाणी पित असताना दिसून आलेले आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news