Ankita New House : आता घरजावई होऊन राहणार नाही विक्की जैन | पुढारी

Ankita New House : आता घरजावई होऊन राहणार नाही विक्की जैन

पुढारी ऑनलाईन डेस्क

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या घरामध्ये (Ankita New House) बिजनेसमॅन विक्की जैन घरजावई म्हणून राहत असल्याचे वृत्त समोर आले होते. आता विक्कीला घरजावई म्हणून राहावं लागणार नाही. कारण, अंकिता लोखंडे-विक्की यांनी नवं घर घेतलं आहे. अंकिताने घराचा फोटो शेअर केलाय. (Ankita New House)

दोघांनी १४ डिसेंबर, २०२१ रोजी लग्न केले होते. आता काही दिवसांपूर्वी विक्कीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, दोन वर्षांपासून तो अंकिताच्या घरात घरजावई म्हणून राहत आहे. आता दोघे लवकरच नव्या घरात शिफ्ट होतील. दरम्यान, अंकिताने आपल्या नव्या घराचा एक फोटो शेअर केलाय, ते पाहून हे कपल या घरात शिफ्ट होईल.

अंकिता नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटो शेअर करते. आतादेखील तिने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये विक्कीसोबत आपल्या नव्या घराच्या बाल्कनीमध्ये ती उभारलेली दिसते. या बाल्कनीतून मुंबई शहराचे सुंदर चित्र देखील पाहायला मिळतं. दोघांनी एकमेकांचे हात हाथ पकडून पोज देताना दिसत आहेत. या फोटोत अंकिता ऑरेंज कलरच्या सलवार सूटमध्ये दिसते. विक्कीने व्हाईट कलरची टी-शर्ट आणि पँट घातलेली दिसते.

अंकिताने आपल्या या फोटोसोबत एक घर आणि हार्ट इमोजी शेअर केलाय. अंकिताच्या या पोस्टवर फॅन्स, त्यांचे मित्रदेखील शुभेच्छा देत आहेत. कपलच्या पोस्टवर मोनालिसाने लिहिलं की, वाह…ग्रँड पार्टीची प्रतीक्षा होत आहे. अभिनेत्री माही विजने लिहिलं की, तुमची स्वप्ने. यासोबतचं अनेक स्टार्सनी या फोटोवर कमेंट केले आहेत.

विक्की-अंकिताने दोन वर्षांपूर्वी नवं घर घेतलं होतं. कोरोना महामारीच्या कारणामुळे काम पूर्ण न झाल्यामुळे आपल्या घरात शिफ्ट होऊ शकले नाहीत. आता लवकरच दोघेही आपल्या नव्या घरात शिफ्ट होतील.

Back to top button