Roopa Ganguly : राज्‍यसभेत खासदार गांगुली धाय माकलून रडल्‍या; म्‍हणाल्‍या, पश्‍चिम बंगाल आता…” | पुढारी

Roopa Ganguly : राज्‍यसभेत खासदार गांगुली धाय माकलून रडल्‍या; म्‍हणाल्‍या, पश्‍चिम बंगाल आता..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमधील बिरभूम हिंसाचार प्रकरणाचे पडसाद आज राज्‍यसभेत उमटले. सभागृहाचे कामकाज सुरु होताच या हिंसाचारावर सदस्‍यांनी गदारोळ घातला. भाजपच्‍या खासदार रुपा गांगुली ( Roopa Ganguly ) यांना भावना अनावर झाल्‍या. तृणमूल काँग्रेसवर टीका करताना त्‍या धाय माकलून रडल्‍या.

यावेळी रुपा गांगुली म्‍हणाल्‍या की, पश्‍चिम बंगालमधील बिरभूम झालेल्‍या हिंसाचारात ८ जणांचा मृत्‍यू झाला आहे. या सर्वांना जिंवत जाळण्‍यात आले ओ. राज्‍यातील मागील ७ दिवसांमध्‍ये २६ हून अधिक हत्‍या राजकीय कारणातून झाल्‍या आहेत.

Roopa Ganguly : पश्‍चिम बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट लागू करा

पश्‍चिम बंगालमधील हिंसाचारावर बोलताना रुपा गांगुली यांना भावना अनावरण झाल्‍या. त्‍या धाय माकलून रडत म्‍हणाल्‍या, पश्‍चिम बंगालमध्‍ये नागरिकांच्‍या सामूहिक हत्‍या होत आहे. नागरिक राज्‍यातून स्‍थलांतर करीत आहेत. आता पश्‍चिम बंगाल राज्‍य हे राहण्‍याच्‍या लायकीचे राहिले नाही. येथील नागरिकांवर दहशतीमुळे बोलू शकत नाहीत. राज्‍य सरकारच शस्‍त्राची विक्री करत आहे. देशात असे कोणतेही राज्‍य नाही जेथे पुन्‍हा निवडणूक जिंकल्‍यानंतर सरकार नागरिकांची हत्‍या करत आहे. आपण मानव आहोत याचे भान ठेवले जात नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

सीबीआय करणार बिरभूम हिंसाचार प्रकरणाची चौकशी

कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने बिरभूम हिंसाचार प्रकरणाच्‍या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकणाचाी उच्‍च न्‍यायालयाने स्‍वत:हून दखल घेतली होती. राज्‍य सरकारने याप्रकरणाच्‍या तपासात सीबीआयला सहकार्य करावे, असे आदेशही न्‍यायालयाने दिले होते. बिरभूम जिल्‍ह्यातील बोगटूई गावात तृणमूल काँग्रेसच्‍या उपसरपंचाची हत्‍या झाली होती. यानंतर राजकीय संघर्षातून १० जणांना जिंवत जाळल्‍याचा आरोप होत आहे. या हिंसाचारात ८जणांचा मृत्‍यू झाल्‍याचा दावा पोलिसांनी केला आहे. मृतांमध्‍ये दोन मुलांचा समावेश आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button