शेतातील प्लास्टिक कचर्‍याचा होणार पुनर्वापर ; नाशिकमध्ये विविध भागात संकलन केंद्रे | पुढारी

शेतातील प्लास्टिक कचर्‍याचा होणार पुनर्वापर ; नाशिकमध्ये विविध भागात संकलन केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बायर आणि पीआय इंडस्ट्रिज यांच्यातर्फे शेतातील प्लास्टिक कचरा परत घ्या हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. शेतीतील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पातून शाश्वत कृषी शेतीला चालना दिली जाणार आहे. यासाठी नाशिकच्या विविध भागांमध्ये 12 संकलन केंद्रे उभी केली आहेत. या प्रकल्पासाठी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीशी संबंधित 60 गावांमधील 1500 शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.

बायर आणि पीआय इंडस्ट्रिज एकत्रितरीत्या गोळा केलेल्या प्लास्टिक प्रकल्प व्यवस्थापनाचा आर्थिक भाग सांभाळतील. या प्रकल्पात नाशिकमधील शेतातील प्लास्टिक कचरा गोळा केला जाईल आणि हळूहळू शेतकर्‍यांमध्ये जागरुकता निर्माण करून तसेच वर्तनात बदल करण्यासाठी प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत भारतातील इतर राज्ये आणि शहरांमध्ये हा प्रकल्प विस्तारित केला जाईल. यातून कचर्‍याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यावर भर दिला जाणार आहे.

सह्याद्री फार्म्स याबाबत मदत करणार आहे. या उपक्रमासंदर्भात सिमॉन थॉर्स्टन बायबुश म्हणाले, “कृषी क्षेत्राचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यासारख्या या क्षेत्रातील खडतर आव्हानांचा सामना करण्यासाठी समविचारी भागधारकांसोबतची भागीदारी फार महत्त्वाची आहे. यासाठी प्लास्टिक कचरा गोळा करणारे, त्यावर प्रक्रिया करणारे आणि पुनर्वापर करणारे यांना डिजिटल माध्यमातून जोडले जाईल. प्रशांत हेगडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिकसोबतच सर्व प्रकारच्या ‘कचर्‍या’वर मूल्य म्हणून प्रक्रिया करायला हवी. प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावल्याने आपल्याला परिसंस्थेतील समतोल साधता येईल.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

 

Back to top button