विवेक अग्निहोत्रीच्या ऑफिसमध्ये घुसून दोघांची मॅनेजरला धक्काबुक्की | पुढारी

विवेक अग्निहोत्रीच्या ऑफिसमध्ये घुसून दोघांची मॅनेजरला धक्काबुक्की

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली आहे. या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. एकीकडे विवेक अग्निहोत्री आणि त्यांची टीम या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. तर दुसरीकडे काही लोक या चित्रपटाबाबत आक्षेपही नोंदवत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दोघे जबरदस्तीने त्यांच्या मुंबईतील कार्यालयात घुसले आणि विवेकच्या मॅनेजरला धक्काबुक्की केली.

याबाबत विवेकने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. विवेक म्हणाले, होय, धमक्या येत आहेत. अलीकडेच दोन मुलांनी आमच्या ऑफिसमध्ये घुसखोरी केली. मी आणि माझी पत्नी ऑफिसमध्ये नसताना हा प्रकार घडला. एकच व्यवस्थापक होता. त्या मुलांनी त्याला दरवाजाकडे ढकलले. ते पडले. यानंतर त्याला माझ्याबद्दल विचारले आणि नंतर तो पळून गेले. या घटनेबाबत मी कोणाशीही बोललो नाही कारण अशा लोकांना कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मिळावी असे मला वाटत नाही.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट केवळ चित्रपट नसून ती एक चळवळ आहे, असे मत विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. या चित्रपटाच्या यशाने विवेक अग्निहोत्री खूप खूश आहेत. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना विवेक म्हणाले की, जगभरातील प्रेक्षक हा चित्रपट शांतपणे पाहत आहेत. एकूण ३ तास ५० मिनिटे…हा विनोद नाही.

ते पुढे म्हणाले की, लोक जगभरात उपस्थित असलेल्या काश्मिरी पंडितांपर्यंत पोहोचत आहेत. कॅनडामध्ये हा चित्रपट इतका चांगला का चालला आहे? तिथे दोन शोपासून सुरुवात झाली आणि आता तिथे ९० शो सुरू आहेत. हा चित्रपट भारतीयांना एकमेकांशी जोडणारा आहे. लोक त्याबद्दल बोलत आहेत आणि त्यावर चर्चा होत आहे.

त्याचवेळी विवेक यांना जेव्हा विचारण्यात आले की, फाईल्स फ्रँचायझीचे चित्रपट आता थांबले आहेत का? तर यावर विवेकने उत्तर दिले की, आता तो दिल्ली फाईल्स बनवणार आहे. द फाईल्स आणल्यानंतर ते फाइल्स ट्रायलॉजी बंद करतील.

Back to top button