आणि उलगडले राजभवनावरील मेजवानीचे रहस्य | पुढारी

आणि उलगडले राजभवनावरील मेजवानीचे रहस्य

पणजी, पुढारी वृत्तसेवा : आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या हैदराबाद एफ. सी. क्लबच्या स्वागतासाठी सोमवारी राजभवनावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी समारंभाचे आयोजन केले. राजभवनाने एवढ्या तातडीने या स्पर्धेच्या विजेत्याची दखल घेण्यासाठी केरळा ब्लास्टर या संघ कारणीभूत आहे की काय असे वाटू शकते. तो संघ उपविजेता ठरला आहे. मात्र हैदराबाद संघाचे सहमालक वरुण त्रिपुरानेनी हे मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरीबाबू कंभांपटी यांचे जावई असल्याचे सत्य समोर आले आणि या समारंभाच्या आयोजनामागच्या कारणांचा उलगडा झाला.

राजभवनाच्या दरबार सभागृहात झालेल्या या समारंभात राज्यपालांनी या विजेत्या संघातील सर्व खेळाडूंचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. राज्यपालांच्या पत्नी अ‍ॅड. के. रिटा यांनी संघाच्या सहमालकांच्या पत्नी चंदना खंबांसेपट्टी यांना साडी भेट दिली. संघाचे संचालक सुजय शर्मा, प्रशिक्षक मार्कुस रोका, कप्तान जुआंव व्हिक्टर आल्बुकर्क ब्रुनो यांना राज्यपालांनी स्मृतिचिन्हे प्रदान केली. प्रशिक्षकानी राज्यपालांना संघाची जर्सी तर संचालकांनी राज्यपालांना भेटवस्तू प्रदान केली.

यावेळी उपविजेता संघ केरळा ब्लास्टर उपस्थित न राहिल्याबद्दल राज्यपालांनी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, खेळात हार जीत असते. खिलाडू वृत्तीने ते स्वीकारले पाहिजे. ते या समारंभात सहभागी झाले असते तर आनंद झाला असता. हैदराबादचा संघ जिंकला आणि मिझोरामच्या राज्यपालांना शुभेच्छा दिल्या, आजही मिझोराममधील राजभवनाशी चांगले संबंध आहेत. त्यांचे जावई हे विजेत्या संघाचे सहमालक असल्याने त्यांनाही या समारंभासाठी निमंत्रित करण्याचे ठरवले. अत्यंत कौटुंबिक वाटावा असा हा सोहळा आहे. या सन्माला उत्तर देताना वरुण यांनी नमूद केले, की सात महिने संघ गोव्यात होता. गोमंतकीय आदरातिथ्याचा चांगला अनुभव संघासोबत आहे. स्पर्धा जिंकल्याने सर्वजण आनंदात आहेत त्यात आम्ही सारे सहभागी आहोत.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button