रणदीप हुड्डा आणि लिन लॅश्राम
रणदीप हुड्डा आणि लिन लॅश्राम

रणदीप हुड्डा पडलाय शाहरुखच्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

रणदीप हुड्डा या बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या जबरदस्त अदाकारीने प्रत्येक चित्रपटात जीव ओतून काम केलं आहे. त्‍यानं आतापर्यंत आपलं खासगी जीवन सर्वांपासून दूर ठेवलं;  आता तो त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आला आहे. रणदीप हुड्डा याचे नाव एका तरुणीसोबत जोडले जात आहे. याच कारणामुळे रणदीपने त्याच्या लव्हलाईफमुळे पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणदीप सध्या मणिपूर मॉडेल लिन लॅश्राम (रणदीपची गर्लफ्रेंड) ला डेट करत आहे.

चित्रपट अभिनेत्री आहे लिन लॅश्राम

लिन लॅश्रामने शाहरुख खानच्या ओम शांती ओम, प्रियांका चोप्रा स्टारर मेरी कॉम आणि रंगूनमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मॉडेलिंग विश्वात लिनची लोकप्रियता फिल्म इंडस्ट्रीच्या तुलनेत निर्माण झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रणदीप आणि लिन गेल्या ८ महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही पहिल्यांदाच येथे स्पॉट झाले होते.

पाच वर्षांपूर्वी लिन लॅश्राम आणि रणदीप बॉक्सिंग सामन्यावेळी दिसले होते. यादरम्यान त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. त्यावेळी रणदीपने आपल्या लव्हलाईफबद्दल मौन बाळगले होते. अलीकडेच रणदीपने सोशल मीडियावर आपल्या मित्रांचा काढलेला एक फोटो शेअर केला. या छायाचित्रात लिनही दिसत आहे. हे चित्र समोर येताच पुन्हा एकदा दोघांच्या अफेअरची चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.

कोण आहे लिन लॅश्राम?

'ओम शांती ओम' आणि 'मेरी कॉम' सारख्या चित्रपटात काम केलेल्या लिन लॅश्राम या मणिपूर येथील मॉडेलला डेट करत आहे. मात्र, रणदीप हुड्डा आणि लिन लिव्ह-इनमध्ये राहतात की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण दोघेही आपल्‍या नात्‍यावर जाहीर बाेलले नाहीत. रणदीपच्या आयुष्यात लिनने वेगळे स्थान निर्माण केल्याचेही म्हटले जात आहे.

रणदीप आणि लिन जवळपास ८ महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. काही काळापूर्वी लिनने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक फोटोही शेअर केला होता. यामध्ये रणदीपही तिच्यासोबत दिसत होता.

हेही वाचलं का?

 

and
View this post on Instagram

 

A post shared by Lin Laishram (@linlaishram)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news