Emraan Hashmi : इम्रान हाश्मी म्हणतोय आता 'इश्क़ नहीं करते' (Video) | पुढारी

Emraan Hashmi : इम्रान हाश्मी म्हणतोय आता 'इश्क़ नहीं करते' (Video)

पुढारी ऑनलाईन : गेल्या २० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीच्या (Emraan Hashmi) नवीन म्युझिक व्हिडिओ येत आहे. या व्हिडिओत इमरानसोबत प्रसिद्ध गायक बी प्राक (B praak) आणि अभिनेत्री सहर बाम्बा ( Sahher Bambba ) दिसणार आहे. खास करून या गाण्यात तिघांची जुगलबंदी चाहत्याना पाहायला मिळणार आहे.

इम्रान हाश्मीने (Emraan Hashmi) नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत नविन म्युझिक व्हिडिओ येत असल्याचा खुलासा केला आहे. या फोटोत इमरान स्वत:, गायक बी प्राक आणि अभिनेत्री सहर बाम्बा दिसत आहेत. यावेळी तिघांनीही ब्लॅक रंगाचे कपडे परिधान करत ‘इश्क़ नहीं करते’ हे गाणे घेवून येत असल्याचे सांगितले आहे. या फोटोत खास करून, गाणे २१ मार्च २०२२ रोजी रिलीज होत असल्याची डेट दिली आहे. या गाण्यात इमरान आणि सहर यांचा केमिस्ट्री पाहायला मिळाणार आहे. यामुळे इम्रान चाहते खूपत आनंदीत झाले आहे. हे गाणे कपलमधील दोघांच्या ब्रेकअपवर आधारित आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये इमरानने ‘तुम्ही तयार रहा! २०२२ च्या सर्वात मोठ्या सरप्राईझसाठी!, २१ मार्च २०२२ रोजी “इश्क नही करते” टीझर रिलीज होणार आहे.’ असे लिहिले आहे. यावरून इमरानचा नव्याने ‘इश्क नही करते’ म्यूझिक व्हिडिओ येत असल्याचे समजते आहे. अनेक दिवसानंतर इमरान पुन्हा भेटीस येत आसल्याने चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

इश्क नही करते हे गाणे डीआरजे रेकॉर्ड्स आणि राज जयस्वाल यांनी प्रस्तुत केलं आहे. या गाण्याला संगीतबद्ध बी प्राक यांनी तर गीतकार जानी आहेत. दिग्दर्शन B2gether Pros यांनी तर गाण्याची निर्माती राज जयस्वाल यांनी केली आहे. बी प्राकचा दमदार आवाज आणि त्याने गायलेली एकापेक्षा एक हिट गाणी आजही चाहत्याच्या मनावर राज्य करत आहेत. तर इमरान त्याच्या गाण्याच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. इमरानच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर हे गाणे रिलीज होऊ शकते अशी अपेक्षा आहे.

इम्रानने या गाण्याविषयी म्हटले आहे की, “मी या गाण्याबद्दल खूप उत्सुक आहे आणि या गाण्याला चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आणि प्रतिसाद पाहून मला खूप सकारात्मक वाटत आहे. हा म्युझिक व्हिडिओ माझ्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून रिलीज करण्यात मला आनंद आहे. असे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

Back to top button