Mouni Roy : हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये मौनीच्या बोल्ड अदा ??❤️
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय ( Mouni Roy ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. मौनी रॉय २७ जानेवारी २०२२ रोजी बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाह बंधनात अडकली होती. लग्नानंतर तिच्या सौंदर्यात दिवसेंदिवस आणखीच भर पडत आहे. लग्नानंतरची पहिली होळी आणि रंगपंचमीचा सण तिने उत्साहाने साजरा केला. तर सध्या मौनी श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याबाबतचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मौनी रॉयने ( Mouni Roy) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर श्रीलंकेतील कोलंबोमधील समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. या फोटोत मौनीने हिरव्या रंगाच्या लॉग ड्रेसमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. याशिवाय आणखी एका फोटोत तिने बिकिनीसोबत मोठी हॉट परिधान केलेली दिसत आहे. या फोटोतील तिच्या मादक अदा आणि सौंदर्यांने चाहत्यांना भूरळ घातली आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यासोबत राहा.' असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका फोटोत 'विश्वास, चैतन्य, प्रार्थना, प्रेम, नृत्य आणि हास्य' यांचा उल्लेख केला आहे. या फोटोतील खास म्हणजे. मौनीच्या सौंदर्यासोबत समुद्र किनाऱ्यातील पाण्याचा लाटा आकर्षित करत आहेत. चांदनी रात्रीच्या वेळी हटके पोझ देत तिने हे फोटोशूट केले आहे.
याआधीही मौनीने पती सूरज नांबियारसोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी करतानाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'तुझ्या सौंदर्याने घायाळ केलं'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'हॉट, ग्लॅमरस दिसतेस' असे म्हटले आहे. समुद्र किनाऱ्यावरील तिचे फोटो चाहत्याचे पसंतीस उतरले आहेत.
मौनी आणि सुरज यांनी यावर्षी २७ जानेवारी मल्याळी आणि बंगाली रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. गोव्यातील या लग्नसोहळ्यात मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. मौनीच्या वर्कफ्रंट बोलायचे झाल्यास 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर सीजन ५' रिअॅलिटी शोची ती जज आहे. याशोमध्ये तिच्यासोबत रेमो डिसूझा आणि सोनाली बेंद्रे देखील आहेत.
याशिवाय मौनी अभिनेता रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि साऊथ स्टार नागार्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचलंत का?

