तेजस्वी प्रकाश-करण रोमँटिक मूडमध्ये, कॅमेऱ्यात कैद झाले मोमेंट्स | पुढारी

तेजस्वी प्रकाश-करण रोमँटिक मूडमध्ये, कॅमेऱ्यात कैद झाले मोमेंट्स

पुढारी ऑनलाईन डेस्क

बिग बॉसची विजेती तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्राच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोन स्टार्सनी रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र होळी साजरी केली. दोघे रोमँटिक मूडमध्ये कॅमेऱ्यात कैद झाले. या मोमेंट्सचे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये हे दोन स्टार रोमँटिक मूडमध्ये हरवलेले दिसत आहेत.

होळी स्पेशलमध्ये करण-तेजस्वी रोमँटिक

होळीच्या दिवशी मुंबईत आयोजित सेलिब्रिटींच्या होळी पार्टीत अनेक टीव्ही स्टार्स पोहोचले. या पार्टीत तेजस्वी तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत होळीच्या रंगात रंगण्यासाठी पोहोचली. समोर आलेल्या फोटोंमध्ये निशांत भटही त्याच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहे.

करणने तेजस्वीची इच्छा पूर्ण केली

या होळीच्या दिवशी तेजस्वी प्रकाश यांची इच्छा होती की, जर तिला सर्वात आधी कोणी रंग लावला तर तो करण कुंद्रा असावा. तेजस्वीची ही इच्छा करणने पूर्ण केली. तेजस्वीने इंस्टाग्रामवर केलेल्या अभिनेत्रीच्या पोस्टवरून हे उघड झाले आहे. करणसोबतचे फोटो शेअर करत तेजस्वीने कॅप्शनमध्ये लिहिले- yes yes she managed to put colour on me first.. happy holi from us to you!!.

किसिंग फोटो व्हायरल

समोर आलेल्या फोटोंमध्ये करण कुंद्रा तेजस्वीला किस करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये करण तेजस्वीला आलिंगन देताना तर कधी कॅमेरासमोर पोज देताना दिसताहेत. हे फोटो शेअर करत करणने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘आम्ही दोघे एकमेकांचे वेडे आहोत. आम्हाला भीती वाटते की लोक आता आमच्यासोबत फिरणे बंद करतील पण गरज काय? आमची पहिली होळी.

अन् प्रेमकहाणी सुरू झाली

बिग बॉस हिंदीमध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची प्रेमकहाणी सुरू झाली. या शोदरम्यान त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की प्रत्येक भांडणावर मात करून दोघेही या शोमध्ये एकत्र दिसले. तेजस्वी आणि करणच्या पालकांनीही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला.

हेही वाचलं का?

Back to top button