टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती-2’ चा आला ट्रेलर! | पुढारी

टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती-2’ चा आला ट्रेलर!

पुढारी ऑनलाईन:  ‘हिरोपंती’ मधून टायगर श्रॉफने पदार्पण केले त्यावेळी हा ‘टायगर’ अगदीच ‘मऊ मेणाहुनी’ आहे अशा प्रतिक्रिया आल्या होत्या. डॅशिंग जॅकी श्रॉफचा हा पोरगा पुढे नाव कमावतो की नाही, अशीही शंका अनेकांनी व्यक्‍त केली होती; मात्र मार्शल आर्टमध्ये निष्णात असलेल्या टायगरने लवकरच स्वतःच्या इमेजमध्ये पूर्ण बदल घडवून आणला आणि आता त्याची ओळख अ‍ॅक्शन आणि नृत्यामध्ये निपूण असणारा एक उत्तम अभिनेता अशी आहे. आता त्याच्या ‘हिरोपंती-2’ हा ट्रेलर आला आहे.

टायगरने स्वतः हा ट्रेलर सोशल मीडियातून शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘बबलू ढुंढने से नही, किस्मत से मिलता है. डबल अ‍ॅक्शन, डबल ड्रामा, डबल एंटरटेन्मेंट, डबल ‘द हिरोपंती!’ एकंदरीत ‘हिरोपंती’ ते ‘हिरोपंती-2’ दरम्यान टायगरमध्ये झालेले ‘डबल’ बदल या नव्या चित्रपटात दिसून येतील.

अहमद खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात तारा सुतारिया आणि नवाजुद्दिन सिद्दीकी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 29 एप्रिलला मोठ्या पडद्यावर येणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button