मनिके मांगे हिते फेम श्रीलंकन गायिका योहानी हिला मिळाली नवी संधी | पुढारी

मनिके मांगे हिते फेम श्रीलंकन गायिका योहानी हिला मिळाली नवी संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क

व्हायरल सेन्सेशन मनिके मांगे हिते या गाण्याची गायिका योहानीला नवी संधी मिळालीय. योहानीच्या ‘मनिक मांगे हिते’ या धमाकेदार गाण्याने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली. आता योहानीला टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनी करारबद्ध केले आहे.

टी-सीरिजने गुरु रंधावा, जुबिन नौटियाल, तुलसी कुमार, सचेत-परंपरा, हनी सिंग, पायल देव यांच्यासह अनेक कलाकारांना उत्तम संधी दिली आहे. आता या यादीत श्रीलंकन योहानीचेही नाव जोडले गेले आहे. योहानीच्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्याने इंटरनेटवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.

भूषण कुमार म्हणतात की, योहानीला टी-सीरीजचा एक भाग म्हणून मिळाल्याने तो खूप उत्साहित आहे. आम्ही संगीताच्या ट्रेंडमध्ये नेहमीच आघाडीवर असतो आणि योहानी सारख्या कलाकारांसोबत, आम्ही काही रेकॉर्डब्रेक आणि चार्ट-टॉपिंग संगीत प्रेक्षकांसाठी आणण्यासाठी उत्सुक आहोत.

ही संधी मिळाल्याने योहानीही खूप आनंदी आहे. ती म्हणाली, ‘या गाण्याने माझे आयुष्य खरोखरच बदलून टाकले आणि त्याचा इतका प्रभाव पडेल असे मला कधीच वाटले नव्हते. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे.

योहानीला भारतात खूप लोकप्रियता मिळाली. बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्‍चन यांनीही त्‍यांच्या चित्रपटातील एका गाण्यावर योहानीच्‍या गाण्‍याची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली होती. बिग बींनी या गाण्याचं कौतुक करताना लिहिले-क्या किया और क्या हो गया?

कोण आहे योहानी?

योहानीचे पूर्ण नाव योहानी डिलोका डिसिल्वा आहे. तिचा जन्म ३० जुलै, १९९३ रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झाला. त्‍याने २०१६ मध्‍ये YouTuber म्‍हणून करिअरची सुरूवात केली. लोकांना तिची गाणी आणि रॅप आवडू लागले. योहानीला श्रीलंकेत ‘रॅप प्रिन्सेस’ ही पदवी देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yohani (@yohanimusic)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yohani (@yohanimusic)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yohani (@yohanimusic)

Back to top button