समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर आनंदच : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर आनंदच : खासदार सुप्रिया सुळे

बारामती; पुढारी वृत्तसेवा : एमआयएमने महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट नकार दर्शवला असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र, समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर ती आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया दिली.

बारामतीत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्रित काम करायचे असेल, समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे. विकासासाठी, कामासाठी सगळे एकत्रित येणार असतील आणि राज्याचे चांगले होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. तसेच कुठल्याही राज्यासाठी ती चांगलीच गोष्ट असणार असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

यादरम्यान खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी परस्परविरोधी मते व्यक्त केल्याने राजकिय चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : तळातून गाळाकडे | Pudhari Agralekh

Back to top button