‘पुष्पा’च्या श्रीवल्लीचे नवे फोटो व्हायरल; आईसोबत बोलताना साध्या लूकमध्ये रश्मिका

rashmika mandanna
rashmika mandanna

पुढारी ऑनलाईन डेस्क

'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या अफाट यशाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील श्रीवल्ली हे पात्रही प्रेक्षकांना खूप आवडले. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिने श्रीवल्लीची भूमिका साकारलीय. श्रीवल्ली चित्रपटात रश्मिकाचा अगदी साधा लूक आहे. तरीही ती इतकी सुंदर दिसते. खऱ्या आयुष्यात तिची स्टाईल इतकी जबरदस्त आहे की त्याची एक झलक पाहून लोक वेडे होतात. रश्मिकाचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या आईशी बोलताना दिसते.

व्हिडिओ कॉल फोटो व्हायरल

हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये एका बाजूला अभिनेत्री दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला तिची आई दिसत आहे. रश्मिका तिच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाचे काही फोटो क्लिक करण्यात आले आहे. अभिनेत्रीचा हा साधा लूक चाहत्यांना खूप आवडतो.

तिने तिच्या अधिकृत इस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की- 'व्हिडिओ कॉलवर आईला भेटत आहे…' यासोबतच रश्मिकाने तिच्या आईचे काय झाले हेही लिहिले. कॅप्शनमध्ये रश्मिकाने लिहिले की, तिची आई म्हणाली की आज ती खूप छान दिसत आहे.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. यासोबतच तिचे केस मोकळे दिसत असून साध्या मेकअपमध्ये दिसतेय. या लूकमध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे की तिचे चाहते सतत या फोटोवर कमेंट करत आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत.

श्रीवल्ली लवकरच 'मिशन मजनू'मध्ये दिसणार आहे. रश्मिका लवकरच 'मिशन मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

रश्मिका मंदान्नाच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात रश्मिकाने सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत काम केले आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. या चित्रपटात रश्मिकाने साध्या श्रीवल्लीची भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news