कॅटरिना-विकीचा पहिला रंगोत्सव | पुढारी

कॅटरिना-विकीचा पहिला रंगोत्सव

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी शुक्रवारी लग्नानंतरचा आपला पहिला रंगोत्सव साजरा केला.

दोघांनी कुटुंबीयांसमवेत होळीचा रंग खेळला आणि विकीने सेल्फी टिपून आपल्या आनंदी कुटुंबाचे फोटो सोशल मीडियात शेअर केले. यामध्ये कॅटरिना आणि सासुबाई वीणा कौशल यांचे बाँडिंग स्पष्टपणे दिसून येते. सासुबाईंनी मायेने सुनबाईच्या गालावर हात ठेवलेला आहे. छायाचित्रात कॅटरिनाचा दीर सनी, सासरे श्याम कौशलही दिसून येतात.

इन्स्टाग्रामवरील हे छायाचित्र पाहून अनेकांनी ‘सुंदर कुटुंब’ अशी प्रतिक्रिया व्यक्‍त करतानाच या कुटुंबाचा साधेपणा भावल्याचे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button