द कश्मीर फाईल्स : वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला केला पार | पुढारी

द कश्मीर फाईल्स : वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला केला पार

पुढारी ऑनलाईन डेस्क : द काश्मीर फाईल्स कमाईच्या बाबतीत नवे रेकॉर्ड बनवले आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईनंतर या चित्रपटाने गती घेतली. हा चित्रपट काश्मीरी पंडितांवरील अत्याचार आणि विस्थापन यावर आधारित आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. द कश्मीर फाईल्स या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही कमाई वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवरील आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्याच्या कमाईने सर्वांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने गती घेतली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १५.१ कोटींची कमाई केली. सहाव्या दिवशी या चित्रपटाने १९.३० कोटींची कमाई करून अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले. या चित्रपटाने १७.५० ते १९.५० कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर ही आकडेवारी, या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई ९६.७५ ते ९८.७५ कोटींच्या घरात पोहोचली होती. या चित्रपटाच्या कमाईशी संबंधित एक ताजी आकडेवारी समोर आलीय.

अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाने १०० कोटींचा वर्ल्डवाईड कलेक्शन केल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक पोस्टर शेअर करून ही कमाई १०६.८० कोटी झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोस्टर कॅप्शनमध्य़े म्हटलंय-आमचा चित्रपट द कश्मीर फाईल्सने सत्य खरे रंग दर्शविले. हॅप्पी होली. #प्रेम #खरा विजय #सिनेमाचा जादू.

अनुपम खेर, पल्लवी जोशी यांच्या अभिनयाने प्रेक्षक थक्क झाले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अक्षय कुमारने शेअर केले आहे- “#TheKashmirFiles @AnupamPKher मधील तुमच्या कामगिरीबद्दल या गोष्टी ऐकून प्रेक्षकांना मोठ्या संख्येने सिनेमागृहात परतताना पाहून आश्चर्य वाटले. लवकरच चित्रपट पाहण्याची आशा आहे. जय अंबे.”

यामी गौतमनेही चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. अभिनेत्रीने ट्विट केले की, ”काश्मिरी पंडिताशी लग्न केल्यामुळे, मला या शांतताप्रिय समुदायावर झालेल्या अत्याचाराविषयी आधीपासून माहिती आहे. मात्र देशातील बहुसंख्य जनता अजूनही अनभिज्ञ आहे. सत्य जाणून घेण्यासाठी आम्हाला ३२ वर्षे आणि एक चित्रपट लागला. कृपया #TheKashmirFiles पहा आणि सपोर्ट करा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

Back to top button