‘द काश्मीर फाईल्स’ नंतर विवेक अग्निहोत्रींची पुढील हिरोईन कंगना राणावत !

‘द काश्मीर फाईल्स’ नंतर विवेक अग्निहोत्रींची पुढील हिरोईन कंगना राणावत !
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माता व दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय होऊ लागला आहे. या चित्रपटाचे यश अग्निहोत्री सध्या साजरे करत असताना त्यांनी आपल्या नव्या चित्रपटावर काम सुरू केले आहे. या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी त्यांनी अभिनेत्री कंगना राणावतशी बोलणी सुरू केली आहे. ही बोलणी प्राथमिक टप्प्यात असून सध्या एक – दोन बैठका झाल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत अग्निहोत्री आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

बॉलीवुड हंगामाच्या सूत्रांनुसार, विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी एका पात्रासाठी कंगना राणावत हिच्याशी चर्चा सुरू केली आहे. कंगनानेही अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. या दोघांमध्ये घनिष्ठ संबंध असून दोघांच्याही विचारसरणीत कमालीची एकवाक्यता आहे. या चित्रपटासाठी त्यांच्यामध्ये प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू असली तरी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे कंगनाकडून तोंडभरून कौतुक

'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना कंगनाने म्हटले आहे की, संपूर्ण चित्रपट इंडस्ट्रीमध्ये जेवढे पाप झाले आहे, ही पाप या चित्रपटाच्या टीमने धुऊन टाकली आहेत. इतका उत्कृष्ट चित्रपट त्यांनी बनवला आहे. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे. इंडस्ट्रीमधील काही जण बिळात जाऊन लपले आहेत, त्यांनी आता बाहेर आले पाहिजे. आणि 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे प्रमोशन व्हायला हवे. इंडस्ट्रीवाले फालतू चित्रपटांना प्रोत्साहन देतात,अशीही टीका कंगणाने केली आहे.

दरम्यान, 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा (Y category security) पुरवली आहे. या सुरक्षा व्यवस्थेत सीआरपीएफचे सुरक्षा कवच असते. विवेक अग्निहोत्री यांना काही लोकांकडून धमक्या आल्या होत्या. याबाबत गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने अग्निहोत्री यांनी वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news