द काश्मीर फाईल्स : तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर २७ कोटींची कमाई | पुढारी

द काश्मीर फाईल्स : तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर २७ कोटींची कमाई

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ ( The kashmir files ) हा चित्रपट ११ मार्च २०२१ रोजी चाहत्यांच्या भेटीस आला. हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी चित्रपटगृह गाठत मनोरंजनाचा आनंद घेतला. अवघ्या तीन दिवसांत  चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींची टप्पा पार केला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतेच ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा तीन दिवसांच्या कमाईचा आकडा ट्विटरवर शेअर केला आहे. यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.११ मार्च) रोजी ३.५५ कोटी रुपयांची तर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१२ मार्च) रोजी ८.५० कोटी रुपयांची कमाई केली.

तर तिसऱ्या रविवारी (दि. १३ मार्च) रोजी सुट्टीच्या दिवशी १५.१० कोटींचा गल्ला जमवला आहे. यानुसार The kashmir files या चित्रपटाने आतापर्यंत २७. १५ कोटींची कमाई केली आहे.

या माहितीशिवाय तरण आदर्श यांनी येत्या काही दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचे म्हटले आहे. तर चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button