देवेंद्र फडणवीस : ‘महाविकास आघाडी सरकारमधील सर्वाधिक निधी राष्ट्रवादीलाच’ | पुढारी

देवेंद्र फडणवीस : 'महाविकास आघाडी सरकारमधील सर्वाधिक निधी राष्ट्रवादीलाच'

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना चिमटे काढले आहेत. अर्थसंकल्पातील सर्वाधिक पैसा हा राष्ट्रवादीला देण्यात आला असून त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिकास्त्र सोडले.

देवेद्र फडणवीस यांनी बोलताना निधी वाटपावरून शिवसेनेला कसा निधी कमी मिळाला आहे आणि राष्ट्रवादीला कसा जास्त मिळाला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. ते अर्थसंकल्पावर चर्चा करताना म्हणाले की, अर्थसंकल्पातील एकूण निधीपैकी ५७ टक्के निधी राष्ट्रवादीच्या खात्यांना मिळाला. त्यानंतर काँग्रेसच्या खात्यांना २६ टक्के निधी मिळाला आहे. सर्वात कमी १६ टक्के निधी शिवसेनेच्या खात्यांना मिळाला. ज्या ठिकाणी सर्वाधिक वेतनावर खर्च होतो अशी खाती काँग्रेसच्या वाट्यात असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, २२ हजार कोटी रुपये वित्तीय तुटीत वाढ झाली आहे. तुलनेत खर्च मनमानी पद्धतीने होत आहे. वाढत्या कर्जाची चिंता करण्याची गरज नाही, मात्र ते खर्च कुठे करतात हे याकडे पाहिलं पाहिजे असे ते म्हणाले.

हे ही वाचलं का ?

Back to top button