आलिया भट्टनं गंगुबाई काठियावाडीनंतर दिली गुड न्यूज | पुढारी

आलिया भट्टनं गंगुबाई काठियावाडीनंतर दिली गुड न्यूज

पुढारी ऑनलाईन डेस्क

आपल्या टॅलेंटने बॉलिवूडमध्ये धमाका केल्यानंतर आलिया भट्ट आता जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री गेल्या वर्षी keur आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सच्या शोधात होती. आता अभिनेत्री आलिया भट्टच्या मेहनतीला फळ आल्याचे दिसते. ती हॉलिवूडची सुंदर अभिनेत्री गल गदोत सोबत एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

तरण आदर्शने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून सांगितले होते की, नेटफ्लिक्सचा आगामी चित्रपट हार्ट ऑफ स्टोनमध्ये आलिया गल गदोतसोबत काम करणार आहे. हा चित्रपट टॉम हार्पर दिग्दर्शित थ्रिलर असू शकतो. मात्र, बॉलिवूड अभिनेत्रीच्या भूमिकेबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, गल गदोतने आगामी ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सेटवरील अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात ती काळ्या रंगाचे जाकीट घातलेली दिसत आहे. अभिनेत्रीने खुलासा केला की, आगामी चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव रेचल स्टोन असेल. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रेचेल स्टोन. तुम्हाला भेटून आनंद झाला.”

गल गदोतची भारतीय कलाकारासोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती बॉलीवूड स्टार अली फझलसोबत ‘डेथ ऑन द नाईल’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली होती. यामध्ये गल गदोतने वधूची भूमिका केली होती तर मिर्झापूर स्टार फजलने तिच्या चुलत भावाची भूमिका केली होती.

दरम्यान, भट्टचा नुकताच गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज झालाय. हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात तिने कामाठीपुरा येथे कोठा चालवणाऱ्या गंगूबाईची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

Back to top button