पुढारी ऑनलाईन डेस्क
महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारे चित्रपट बॉलिवूडमध्ये येऊन गेले. मदर इंडिया हा चित्रपट तर चित्रपट इंडस्ट्रीत मैलाचा दगड ठरला. ८ मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) साजरा केला जातो. महिला समाजाचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्या योगदानाचे सन्मान करताना त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. (International Women's Day)
बॉलीवूडमध्येदेखील असे अनेक चित्रपट पाहायला मिळाले, ज्यामध्ये महिलांनी आपली ताकद दाखवून दिली. समाजामध्ये महिलांच्या योगदानाला खूप चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आलं. मदर इंडिया ते गुंजन सक्सेना आणि आलिया भट्टच्या 'राजी' पासून ते तापसी पन्नूच्या 'पिंक' पर्यंत चित्रपट जगतात असे चित्रपट आले, ज्यामुळे महिला सक्शक्तीकरणाला प्रोत्साहन मिळाले.
गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूरने मुख्य भूमिका साकारली. ती एक धाडसी युवा अधिकारी गुंजन सक्सेनाच्या आयुष्याशी प्रेरित कहाणी होती. तिने १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान युद्ध क्षेत्रात भरारी घेणारी पहिली भारतीय महिला वायू सेना अधिकारी होती. हा चित्रपट फ्लाईट लेफ्टनेंट गुंजन सक्सेनाचा बायोपिक होता.
थप्पडमध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात तिने एका गृहिणीची भूमिका साकारली होती. अमृताची भूमिका साकारणारी तापसी आपलं घर – संसार सांभाळणे आणि एक परफेक्ट पत्नी बनण्यासाठी आपली स्वप्ने मागे टाकते. परंतु, अमृताचं आयुष्य एका प्रसंगानंतर बदलतं. आपला पती, घरासाठी इतकं सर्व करूनदेखील तिचा पती तिच्यावर हात उचलतो. हा चित्रपट घरगुती हिंसाचारवर भाष्य करताे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा हा चित्रपट २०१२ मध्ये आलेला एक ड्रामा कॉमेडी चित्रपट होता. चित्रपटामध्ये श्रीदेवी यांनी एक गृहिणी महिला शशीची भूमिका साकारली होती. ती आपल्या परिवारासाठी सर्वकाही करते. पण, केवळ इंग्रजी येत नसल्याने ती आपली मॉर्डन मुले आणि हाय-फाय पतीसोबत तिचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा घरात तिला अपमानही सहन करावा लागतो. ती इंग्रजी शिकते आणि सगळ्यांना धक्का देते. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, वेळ पडली की महिला सर्वकाही करायला सक्षम होते.
'क्वीन'मध्ये अभिनेत्री कंगना राणौतने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये ती एक खूप साधी मुलगी दाखवण्यात आली होती. आपलं लग्न मोडल्यानंतर हनीमून पॅकेजवर एकटीचं परदेशात फिरायला जाते. आणि पहिल्यांदाच ती घरापासून दूर जगाला एक्सप्लोर करते. यावेळी ती आधीपेक्षा स्ट्रॉन्ग आणि स्वावलंबी बनते.
बॉलीवूडचा हा चित्रपट १९५७ मध्ये रिलीज झाला होता. महिला सशक्तीकरणाची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा 'मदर इंडिया'चा उल्लेख नक्की होतो. मेहबूब खान द्वारा लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार आणि राज कुमार मुख्य भूमिकेत दिसले होते. गावात राहणारी महिला राधाची कहाणी आहे. जिला खूप संकटांचा सामना करावा लागतो. परिस्थितीशी दोन हात करत ती आपल्या मुला-बाळांना मोठं करते.
हेही वाचलं का?