Metaverse मध्ये पाहता येणार प्रभासचा राधेश्याम चित्रपटाचा ट्रेलर | पुढारी

Metaverse मध्ये पाहता येणार प्रभासचा राधेश्याम चित्रपटाचा ट्रेलर

पुढारी ऑनलाईन

Prabhas आणि Pooja Hegde चा नवा चित्रपट Radhe Shyam चर्चेत आहे. प्रभास आणि पूजा हेगडेच्या अभिनयाशिवाय आणखी एखा गोष्टीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे- राधे श्यामचा ट्रेलर metaverse मध्ये पाहिलं जाऊ शकतं. हा असा पहिला चित्रपट आङे, ज्याचा ट्रेलर metaverse मध्ये प्रेक्षक ट्रेलर पाहू शकतील.

तुम्हीदेखील या मेटावर्सच्या माध्यमातून ट्रेलर पाहू शकता. येथे तुम्हाला हाय-एंड डिव्हाईसची आवश्यकता असेल. लो-स्पेसिफिकेशन्स असणारा डिवाईस हँग होण्याचेदेखील चान्सेस आहेत.

सर्वात आधी ब्राउजरमध्ये http://radheshyamworld.com/ ओपन करावं लागेल. यानंतर तुमच्या ईमेल आयडीवरून साईन-अप करावं लागेल. मेटावर्समध्ये एंट्रीच्या आधी आधी तुमचा अवतार तयार केला जाईल.

यानंतर तुम्हा कॅमेऱ्याची परवानगी द्यावी लागेल. मग एक फोटो क्लिक करून तुम्ही तुमचा अवतार तयार करू शकता. यानंतर तुम्ही राधे-श्याम व्हर्चुअल वर्ल्डमध्ये एंट्री करू शकाल. येथे तुम्हाला राधे श्याम चित्रपटाचा सेटअप मिळेल. येथे तुम्ही तुमचा ट्रेलर पाहू शकता.

पण, ही साईट क्रॅश होण्याची तक्रार युजर्स करत आहेत. वेबसाईट ओपन झाल्यानंतर काही वेळानंर साईट क्रॅश होते आणि तुम्ही व्हर्चुअल वर्ल्डमधून बाहेर होता. असं म्हटलं जात आहे की, हा दोष लवकरच दूर केला जाईल आणि ऑडियन्स या मेटावर्स ट्रेलरला एन्जॉय करू शकतात.

Back to top button