‘तलवारीने फडशा पाडीन!’ पुण्यात ‘भाई’ने दिली पोलिसालाच धमकी

‘तलवारीने फडशा पाडीन!’ पुण्यात ‘भाई’ने दिली पोलिसालाच धमकी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तलवार नाचवत दहशत निर्माण करणार्‍या सराईताला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसाची कॉलर पकडून, त्याला तलवारीने फडशा पाडण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार वारज्यातील रामनगरमध्ये घडला आहे. एवढेच नाही तर मी रामनगरचा भाई असून, पोलिसांना घाबरत नाही असे देखील सराईताने म्हटले आहे. त्यामुळे थेट गुन्हेगारच पोलिसांच्या अंगावर हात टाकू लागले तर सर्वसामान्याचे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

याप्रकरणी वारजे पोलिसांनी धनंजय बबन बोराणे (वय.34,रा.म्हसोबा टेकडी रामगनर) याला वारजे माळवाडी अटक केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी महेश बोयने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बोराणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बोराणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास बोराणे हा हातात तलवार घेऊन रामगनर म्हसोबा टेकडी येथे दहशत निर्माण करत असल्याचे कर्मचारी बोयने यांना दिसले. त्यांनी बोराणे याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बोराणे याने बोयने यांची कॉलर पकडून, 'मी पोलिसांना घाबरत नाही. मी रामगनरचा भाई आहे. तु जर मला पकडे तर याच तलवारीने मी तुझा फडशा पाडीन', अशी धमकी देत जोरात धक्का मारून खाली पाडले. यावेळी तेथे हजर असलेल्या इतर पोलिस कर्मचार्‍यांनी बोराणे याला पाठलाग करून पकडले. तरी देखील तो पोलिसांना शिवीगाळ करत होता. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पार्वे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news