Malaika Arora : मलायकाने वाढदिवसानिमित्त आईला  दिल्‍या शुभेच्छा

Malaika Arora : मलायकाने वाढदिवसानिमित्त आईला दिल्‍या शुभेच्छा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

जगात आई आणि मुलीचं नातं सगळ्यात खास असंत; मग तो सामान्य माणूस असो किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी. प्रत्येक आईला जगातील प्रत्येक सुख आपल्या मुलीला द्यायचे असते,तर आईही तिच्या मुलीसाठी सर्वात खास असते. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आई जॉयस अरोरा हिला वाढदिवसानिमित्त एक हृदयस्पर्शी  पोस्ट केली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आई जॉयस अरोरा सोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ती आईविषयी म्हणते, ' आमची आई ही अरोरा कुटुंबाचा कणा आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आईला तिने @joycearora ' इंस्टाग्रामवर टॅगही केले आहे. love you अशी ❤️ हार्ट इमोजी शेअर करत मलायका अरोराने आईविषयी प्रेम व्यक्त केले आहे.

मलायका अरोराच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटीही भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ​​आहेत. मलायकाची आई जॉयस अरोराला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, अभिनेत्री करिश्मा कपूरने लिहिलय, "हॅपी बर्थडे आंटी जॉयस', तर ट्विंकल खन्नानेही तिची प्रतिक्रिया देत, हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक विक्रम फडणीस, कोरिओग्राफर फराह खान आणि महीप कपूर यांनीही मलायकाच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news