टीईटी : हरकळच करीत होते एजंटांकडून वसुली | पुढारी

टीईटी : हरकळच करीत होते एजंटांकडून वसुली

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संतोष हरकळ (वय 42, रा. औरंगाबाद) व अंकुश हरकळ (42, रा. सिंदखेडराजा, बुलडाणा) हे राज्यातील एजंटांकडून वसुलीचे काम करीत होते. नाशिक, जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील पाच एजंटांकडून पाच कोटी 37 लाख रुपये त्यांनी जमा केले. त्यानंतर ते डॉ. प्रीतिश देशमुख, अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमार शिवकुमार ( रा. बंगळुरू) यास दिल्याचे समोर आले आहे.

Ahmedabad blasts : गोध्राकांडचा सूड म्हणून अहमदाबादमध्ये केले होते २१ बाॅम्बस्फोट

अश्विनकुमार याने टीईटी-2018 मधील 600 ते 700 परीक्षार्थींचे परीक्षेतील मार्क्स वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन यास दोन कोटी रुपये, राज्य परीक्षा परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यास 20 लाख रुपये, तर तुकाराम सुपे यास 30 लाख रुपये दिले. तुकाराम सुपेच्या तपासात तो नाशिक येथे उपसंचालकपदावर कार्यरत असताना त्याच्या ओळखीचे दीपक सखाराम व्याळीज यांच्या मुलास परीक्षेत पास करण्याकरिता व प्रमाणपत्र मिळण्याकरिता त्याने एका अनोळखी व्यक्तीमार्फत व्याळीज यांच्या मुलाचे हॉलतिकीट घेतले व काम झाल्यानंतर दोन ते तीन लाख रुपये देण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे.

Ahmedabad serial bomb blast case : मोठा निकाल! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्या तपासादरम्यान त्यांच्याकडून परीक्षार्थींची यादी व पैसे घेतलेल्यांची यादी मिळून आल्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात करीत आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयाने आरोपींना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर आरोग्य भरती गट-क परीक्षा पेपरफुटीमधील आरोपी अतुल राख याला ही 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा

झेंडा लावलेली सायकल अन् शिक्षकांची धावपळ!

पुण्यात आघाडीसाठी काँग्रेसचा ‘हात’ पुढे?

पुणे महापालिकेच्या जागांवर नगरसेवकांचा ताबा; 28 प्रस्ताव मंजूर

Back to top button