रायगड : कोर्लई गावात किरीट सोमय्यांची धडक, शिवसैनिक आक्रमक

रायगड : कोर्लई गावात किरीट सोमय्यांची धडक, शिवसैनिक आक्रमक

रायगड : पुढारी ऑनलाईन

भाजप नेते किरीट सोमय्या आज रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात दाखल झाले. त्यांच्यासोबत आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पाहून शिवसैनिक आक्रमक झाले. येथे जोरदार घोषणाबाजी झाली. ग्रामपंचायत कार्यालयात काही वेळ थांबल्यानंतर सोमय्या अलिबागच्या दिशेने रवाना झाले. पण सोमय्या कोर्लई गावात आल्यानंतर काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयात सोमय्या यांच्यासमवेत भाजप कार्यकर्ते आल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर सोमय्यांनी रेवदंडा पोलिस स्थानकाला भेट दिली.

अलिबामधील १९ घरांचा कर रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रविंद्र वायकर यांनी भरला. बंगले नावावर नाहीत तर कर का भरता? असा सवाल सोमय्या यांनी याआधी उपस्थित केला होता. संजय राऊत यांच्याकडून जोड्याने मारण्याची भाषा वापरण्यात आली. यावर नाराजी व्यक्त करीत भर पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी चप्पल काढून आपण सादर केलेले पुरावे खोटे असल्यास जोड्याने मार खाण्यास तयार आहे, असे आव्हान संजय राउत यांना दिले होते.

रश्मी ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला कर भरला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही घरपट्टी भरली. ५.४२ लाख असे ग्रामपंचायतीने व्हॅल्युएशन दाखवले. २००८ मध्ये व्हिजीट करून घर बांधून झाली. अॅग्रीमेंट २०१४ मध्ये केले. मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला होता. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा खोचक सवाल देखील सोमय्या यांनी राऊत यांच्याकडे उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news