पुणे : पालिकेच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकाची शाळा | पुढारी

पुणे : पालिकेच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकाची शाळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वडगाव शेरी येथील आरक्षित (अ‍ॅमेनिटी स्पेस) जागेवर एका बांधकाम व्यावसायिकाला शाळा बांधण्याची परवानगी देण्याचा ठराव महापालिकेतील सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला आहे. शिक्षण समितीतील या निर्णयावर विरोधी पक्षांकडून भाजपला लक्ष्य केले जात असून, सत्ताधार्‍यांकडून सर्वसामान्य पुणेकरांच्या हक्काची जागा बिल्डरच्या घशात घातल्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.

Ahmedabad serial bomb blast case : मोठा निकाल! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

वडगाव शेरी येथील स. नं. 15 येथील अ‍ॅमेनिटी प्लॉट क्र. 3 वर शाळेचे आरक्षण आहे. ही जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या जागेवर संबंधित विकसक व जागामालकांना शाळा बांधण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव 11 फेब्रुवारी रोजी शिक्षण समिती अध्यक्षा मंजूश्री खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत आला होता. त्या वेळी या प्रस्तावावर प्रशासनाचा अभिप्राय घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला.

हिजाब समर्थकांचा बेळगावात गोंधळ, ६ युवक ताब्यात

स्वत: शिक्षण समिती अध्यक्षा मंजूश्री खर्डेकर, उपाध्यक्ष कालिंदा पुंडे आणि नगरसेविका वर्षा साठे यांनी त्याच दिवशी या निर्णयाचा फेरविचार करण्याचे पत्र देत 16 फेब्रुवारी रोजी विशेष सभेची मागणी केली. त्यानुसार खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत संबंधित विकसकाला शाळा उभारण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी प्रस्तावाला विरोध केला.

शाळा उभारणे व चालविणे ही महापालिकेची जबाबदारी असताना विकसकालाच कशी चालवायला देणार? अशा पद्धतीने महापालिकेच्या सगळ्या मिळकती बिल्डर्सच्या घशात जातील, पुणेकरांना सुविधा मिळणार नाहीत, हे बैठकीत निदर्शनास आणून दिले. परंतू, यानंतरही रासने यांनी मतदान घ्या व बहुमताने प्रस्ताव मंजूर करा, असे खर्डेकर यांना सांगितले. खर्डेकर यांनी मतदान घेण्याचे आदेश दिल्यानंतर समितीत भाजपचे बहुमत असल्याने प्रस्ताव मंजूर केला.
सुभाष जगताप, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचलंत का? 

गायिका वैशाली भसने : माझ्या जिवाला धोका, हत्येचा कट रचला जातोय

‍Bird flu : ठाण्यात बर्ड फ्लूचा उद्रेक, २५ हजार कोंबड्यांना मारण्याचा प्रशासनाचा निर्णय

उत्तर प्रदेशात हजारो मतदारांची नावे गायब; मुस्लिम-दलित मते घटवल्याचा भाजपवर आरोप

Back to top button