sonam kapoor : शीख तरुण पगडी घालू शकतात, मुस्लिम महिला हिजाब का नाही? | पुढारी

sonam kapoor : शीख तरुण पगडी घालू शकतात, मुस्लिम महिला हिजाब का नाही?

पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब  वरुन सुरू झालेला वाद (Karnataka Hijab Row) सुरु आहे. याप्रकरणी हेमा मालिनी, ऋचा चड्ढा यासारख्या अभिनेत्रींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता सोनम कपूरची (sonam kapoor) देखील प्रतिक्रिया आलीय. सोनम कपूरने (sonam kapoor) फोटो शेअर करून आपले मत व्यक्त केलं आहे.

कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमधील हिजाब वरुन सुरू झालेला वाद आता देशातील विविध भागांत पोहोचला आहे. या वादाची सुरुवात कर्नाटकात झाली. उडुपीतील सरकारी पीयू कॉलेजमध्ये हिजाब गालून आलेल्या ६ विद्यार्थीनींना वर्गात येण्यास नकार देण्यात आला होता. यानंतर कॉलेजच्या बाहेर आंदोलन सुरू झालं होतं.

सोनमने इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटोंचं कोलाज शेअर केलं आहे. यातील एका फोटोत एक व्यक्ती पगडी घातलेला दिसतो. दुसऱ्या फोटोमध्ये एक महिलेने हिजाब घातला आहे. या फोटोसोबत सोनमने लिहिलंय- ‘शीख तरुण पगडी घालू शकतात. तर मुस्लिम महिला हिजाब का नाही?’

सोनम एकटी अभिनेत्री नाही, जिने हिजाब विषयी आपली प्रतिक्रिया दिलीय. अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनीने या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ”शाळा शिक्षणासाठी असतात आणि धार्मिक प्रकरणे तेथे घेऊन जाऊ नयेत.’ प्रत्येक शाळेचा एक युनिफॉर्म असतो. त्याचा सन्मान केला पाहिजे. तुम्ही शाळेच्या बाहेर जे हवं के परीधान करु शकता.

अभिनेत्री ऋचा चड्ढाने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय. कर्नाटकाच्या त्या तरुणांवर संताप व्यक्त केला, जे हिजाब घातलेल्या तरुणीसमोर घोषणाबाजी करत होते. ऋचाने ट्विटमध्ये लिहिलं, ‘आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. वाईट, भ्याड झुंडीने मिळून एकट्या महिलेवर हल्ला करतो आणि त्यावर त्यांना गर्व वाटते? लाजिरवाणी गोष्ट आहे, ते काही वर्षांत बेरोजगार, अधिक निराश आणि गरीब होतील. काय वाईट संस्कार आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही. ‘

हेही वाचलं का? 

Back to top button