Madhuri : धक-धक गर्ल माधुरी ‘मिनी शार्ट’मध्‍ये अवतरली आणि सारेच… | पुढारी

Madhuri : धक-धक गर्ल माधुरी 'मिनी शार्ट'मध्‍ये अवतरली आणि सारेच...

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) नेहमीच आपल्या सौदर्यांने चाहत्यांना भूरळ घालत असते. नेटफ्लिक्सवर ‘द फेम गेम’ (The Fame Game) वेबसीरीज तिची लवकरच येत आहे. याच शोच्या प्रमोशनमध्ये सध्या माधुरी दीक्षित बिझी आहे. या कार्यक्रमातील तिच्या खास ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या तर या शाेचा होस्ट, अभिनेता अर्जुन बिजलानी तर माधुरीला एकटक पाहातच राहिला.

अनेक वर्षानंतर माधुरी (Madhuri Dixit ) नेटफ्लिक्सवर ‘द फेम गेम’ वेबसीरीज घेवून येत असून सध्या ती या वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी कार्यक्रमात माधुरी एका ब्लॅक रंगाच्या मिनी शार्ट आउटफिटमध्ये दिसली. स्टेजवर माधुरी पोहोचताच सर्वांच्या नजरा तिने घातलेल्या ड्रेसवर खिळल्या. नेहमी माधुरीला साडीत पाहिले जाते. परंतु, या कार्यक्रामात तिने मिनी शार्ट ड्रेस घातल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये माधुरीने “काळ्या रंगाचे कपडे खास असतात” असे लिहिले आहे. माधुरीच्या सौदर्यांसोबत तिने मोकळे सोडलेल्या केसांनी चार चॉद लावले आहेत. या कार्यक्रमात सर्वाच्या नजरा तिच्या मॉडर्न लूकवर होत्या.

या कार्यक्रमात माधुरीसोबत शोचे होस्ट अर्जुन बिजलानी आणि अनेक दिग्गज स्टार्संनी हजेरी लावली होती. याच दरम्यान माधुरीपैक्षा १६ वर्षानी लहान असलेल्या अभिनेता अर्जुन बिजलानी तिला एकटक पाहातच राहिला. यावेळी अर्जुन बिजलानीने माधुरीच्या हातात- हात दिल्याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. सध्या माधुरी ५४ वर्षाची आहे.

माधुरी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हटके फोटो शेअर करत असते. सध्या तिने ब्लॅक ड्रेसमधील फोटोशूट केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसोबत बॉलिवूड कलाकारांनी कॉमेंन्टसचा पाऊस पाडला आहे. यात बॉलिवूड अभिनेत्रा मौनी रॉयने माधुरीच्या फोटोवर चार स्माईली ईंमोजी शेअर केले आहेत.  डान्सर तुषार खल्ली याने स्माईली आणि प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे.

याशिवाय चाहत्यांनी ‘खूपच क्यूट’, ‘ग्लॅमरस’, ‘छान दिसता’, ‘५४ वर्षीही सुंदर दिसता’ आणि ‘५४ वर्षीही तुम्हच्या सौंदर्याची जादू कायम आहे.’ अशा हटके कॅमेंन्टस केल्या आहेत.

माधुरीने ‘दिल’, ‘कोयला’, ‘राजा’, ‘हम आपके हैं कौन’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’ यासारख्यी अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. माधुरीच्या देवदास चित्रपटातील कामाचं खूपच कौतुक झालं. याशिवाय  ‘बकेट लिस्ट’ हा पहिल्‍या मराठी चित्रपटातील अभिनयही चाहत्‍यांच्‍या  पसंतीस उतरला हाेता.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

Back to top button