पुढारी ऑनलाईन
अमेरिकी मॉडल, रिॲलिटी टीव्ही स्टार आणि बिझनेसवुमन काइली जेनर (Kylie Jenner) च्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. काइली जेनरने तिचा पार्टनर, रॅपर ट्रेविस स्कॉट (Travis Scott) सोबत मिळून सोमवारी फॅन्सना गुड न्यूज दिली. तिने दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिला आहे. काइलीने ही गुड न्यूज दिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या फॅन्सनी तिला आणि ट्रेविसला शुभेच्छा दिल्या आहेत.
कॉस्मेटक्सि बिझनेसची फाउंडर काइलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो ब्लू हार्ट ईमोजीसोबत शेअर केला आहे. पण, तिने कॅप्शनमध्ये "2/2/22" असे लिहिल्याने या तारखेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या कॅप्शनवरून समजतं की, बाळाचा जन्म बुधवारी २ फेब्रुवारीला झाला आहे.
काइलीने सोशल मीडियावर आपल्या मुलाची झलक दाखवली आहे. एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, यामध्ये तिची मुलगी स्ट्रोमी वेबस्टर आपल्या भाऊसोबत बाळाचा हात पकडलेला दिसते. बाळाच्या वडिलांनी या पोस्टवर ब्लू आणि ब्राउन हार्टसोबत कमेंट केलं आहे. तर काइलीची आई आणि तिच्या बहिणींनीदेखील कमेंट सेक्शनमध्ये ब्लू हार्ट ईमोजीसोबत प्रेम आणि आनंद व्यक्त केला आहे.
काइलीची आई क्रिस जेनरने कमेंट करून लिहिलंय, "एंजेल पाय". तिची बहिण किम कर्दाशियांनेदेखील एंजेल लिहून सोबत ब्लू हार्ट पोस्ट केलं आहे. यादरम्यान, काइलीने शेअर केलेल्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तिच्या फॅन्स आणि प्रशंसकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काइली-ट्रेविसने २०१८ मध्ये पहिल्या मुलीला स्टोर्मीला जन्म दिला होता. १ फेब्रुवारीला स्टोर्मी चार वर्षांची झाली.