तब्बल २७ वर्ष लतादीदींच्या सेवेत; निधनानंतर सावरणेही झाले कठीण

२७ वर्षे लता मंगेशकर यांची सेवेत घालवेलेले महेश राठोड, यांना लतादीदींच्या निधनानंतर सावरणेही झाले कठीण
२७ वर्षे लता मंगेशकर यांची सेवेत घालवेलेले महेश राठोड, यांना लतादीदींच्या निधनानंतर सावरणेही झाले कठीण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर संपुर्ण देशाला काल शोकसागरात बुडाला. त्यांच्या परिवाराला लतादींदींचे जाण्याने धक्का बसला, पण असाही व्यक्ती आहे जो लतादीदींचे निधन झाल्यानंतर स्वतःला सावरू शकलेला नाही. हा व्यक्ती गेली अनेक वर्षे लता मंगेशकर यांच्या सेवेत असायचा.

महेश राठोड यांना लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अश्रू अनावर झाले. ते यातून अजूनही सावरू शकलेले नाहीत. महेश राठोड म्हणाले आहे की मी आज भरपूर काही गमावलं आहे, मला आता आयुष्यात एकटे पडल्यासारखं वाटत आहे. महेश राठोड गुजरातच्या अमरेली येथील आहेत. लता मंगेशकर महेश राठोड यांना आपला भाऊ मानायाच्या.

२००१ सालापासून लतादीदी महेश यांना राखी बांधायच्या. लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने आपला बहिण कधी परत येणार नसल्याची भावना आहे. त्यांना राखी बांधायला आता बहिण नसेल आणि आता आपल्या बहिणीला पहायलाही मिळणार नसल्याने महेश राठोड दुःखी आहेत.

महेश १९९५ मध्ये मुंबईत आले अन् लतादीदींच्या घरी मिळाली

महेश राठोड १९९५ साली आपले गाव सोडून मुंबईत आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी आले. मुंबईत आल्यानंतर महेश राठोड नोकरी शोधत होते. एकदा मुंबईमध्ये महालक्ष्मीच्या मंदिराजवळ महेश बसले असताना एका माणसाने त्यांना लता मंगेशकर यांच्या घरी काम करण्याची ऑफर दिली. या ऑफरमुळे त्यांना आपण ग्रामिण भागातील असल्याने आपली चेष्टा करत असल्याची महेश यांची भावना होती.

महेश राठोड लता मंगेशकर यांच्या घरी नोकरी रूजू झाल्यानंतर हळूहळू महेश राठोड यांची लतादीदींना सवय झाली. प्रत्येक कामामध्ये लतादीदी महेश यांचा आधार घेऊ लागल्या. लतादीदींची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी महेश राठोड यांनी स्वतः वर घेतली. फक्त आरोग्य आणि सेवा करण्याची नाही तर आर्थिक बाबींची जबाबदारीही महेश राठोड यांच्यावर असायची. लता मंगेश कार्यक्रमांच्या दरम्यानही महेशच त्यांच्या सोबत असायचे.

असे मिळाले होते लता मंगेशकर यांच्या घरी काम

एका पोलिसांनी महेश यांना राधाकृष्ण देशपांडे यांच्याकडे नेले होते. राधाकृष्ण देशपांडे हे लतादीदींसाठी काम करायचे. राधाकृष्ण अनेक वर्षांपासून लतादीदींसाठी काम करायचे. त्यांनी महेश यांचा फोन नंबर घेतला आणि तीन दिवसानंतर प्रभुकुंजवर येण्यासाठी सांगितले. तिथे महेश यांची एक छोटी मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर लतादीदींकडे महेश कामासाठी रूजू झाले. सुरूवातीला ड्रायव्हर म्हणून कामास ठेवण्यात आले, पण महेश यांना ड्रायव्हिंग येत नव्हती. पण तरीही हा म्हणत महेश यांनी ती नोकरी स्वीकारली.

दिवसा लतादीदींसीठी काम तर रात्री अभ्यास

महेश राठोड दिवसा लतादीदींच्या घरी काम करायचे तर रात्री अभ्यास करायचे. अभ्यास आणि काम करत महेश यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर राधाकृष्ण देशपांडे यांनी महेश यांचे काम पाहिले होते ते प्रामाणिक काम करत होते. एके ठिकाणी महेश यांना ही नोकरी सोडायची होती. मात्र देशपांडे म्हणाले की लतादीदींना तुमच्यापेक्षा चांगला माणूस कामासाठी मिळणार नाही. महेश राठोड यांनी हे लक्षात घेतले, आणि लतादीदींसाठी काम करत राहिले. महेश यांना मंगेशकर कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी चार वर्षे लागले.

लतादीदींनीच महेश यांच्या तीन्ही मुलींचे बारसे केले होते.

२००१ साली अचानक लतादीदींनी महेश राठोड यांच्या काकांना फोन केला. महेश तिथे रक्षाबंधन साजरा करण्यासाठी गेले होते. लतादीदींनी महेश यांना प्रभूकुंज वर बोलावले. तिथे लतादीदी रक्षाबंधन असल्याने राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. महेश यांच्या पत्नी यांनी मनिषा हिने सांगितले की लतादीदींनीच तिनही मुलींचे नामकरण केले होते.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news