लासलगाव मार्गावर धारदार हत्याराने वार करुन तरुणाची हत्या | पुढारी

लासलगाव मार्गावर धारदार हत्याराने वार करुन तरुणाची हत्या

मनमाड: प्रतिनिधी : धारदार हत्याराने वार करून तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना मनमाड पासून जवळ लासलगाव मार्गावर घडली. अनिल आहिरे (वय-32, रा. धाबली पिंपळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तपास सुरू केला आहे. चोरीच्या जनावरांच्या वादातून ही हत्त्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज असून घटनास्थळावरून महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. त्यामुळे लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल. असे पोलीस उपधीक्षक समीरसिंग साळवे यांनी सांगितले.

तरुणाची हत्या,www.pudhari.news

या बाबत अधिक वृत्त असे की, मनमाड पासून जवळ लासलगाव मार्गावर एक मृतदेह आढळून आल्याची महिती मिळताच पोलीस उपधीक्षक समीर सिंग साळवे, पोलीस निरीक्षक समीर बावरकर, सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते, गजानन राठोड, हरिश्चंद्र पाळवी, अशोक पवार, नरेश सौंदाणे, उत्तम गोसावी, मुद्दसर शेख, गणेश नरवटे, संदीप झालटे, खैरनार, रणजित चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर, पोटावर व हातावर धारदार हत्त्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास आले. जवळच त्याची मोटारसायकल देखील पडलेली होती.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मयत तरुणाचे नाव अनिल आहिरे असून तो पिंपळगाव ढाबळी येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या घरच्या लोकांशी संपर्क केल्यानंतर मयताचा भाऊ आणि वडील घटनास्थळी आले व त्यांनी मृतदेह अनिलचाच असल्याचे सांगितले. रविवारी अनिल पिकावरील औषधे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून गेला होता, मात्र रात्री तो परत आला नाही अशी माहिती त्याच्या भावाने पोलिसांना दिली. अनिल हा जनावर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता असेही त्याने पोलिसांना सांगितले. कदाचित चोरीच्या जनावरांवरून वाद होऊन त्यातून अनिलची हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी चांदवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल असे पोलीस उपधीक्षक समीरसिंग साळवे यांनी सांगितले.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button