Srivalli : अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या श्रेयस तळपदेचा संदीप पाठक बरोबर ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स… 

Shreyas Talpade
Shreyas Talpade

पुढारी ऑनलाईन डेस्क 

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमूख भूमिका असलेला 'पुष्पा द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट सुपर-डुपर ठरला आहे. लालचंदनची तस्कर कथानक असलेल्या या चित्रपटाचा बोलबोला मनोरंजनविश्वात सुरू आहे. यातील गाण्यांनीही अनेकांना थिरकायला लावले आहे. यातील 'सामी सामी', 'श्रीवल्ली' (Srivalli) या गाण्यांनी तर भल्या-भल्यांना थिरकायला लावले आहे. 'श्रीवल्ली'वर ऑस्ट्रोलियन क्रिकेटर डेविड वॉर्नर देखील थिरकला होता.

सोशल मीडियावर या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी चर्चेत आहेत. तेलुगु भाषेतील पुष्पा-द राईज हा चित्रपट मल्ल्याळम, तमिळ, हिंदी आणि कन्नड भाषेत डब झाला आहे. हिंदी डब चित्रपटाला अभिनेता श्रेयस तळपदेने पुष्पा (अल्लू अर्जुन) या पात्राला आवाज दिला आहे.  

अभिनेता संदीप पाठक आणि श्रेयस तळपदे यांचा 'आपडी थापडी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान  संदीप पाठक आणि श्रेयस तळपदे यांनी एका समुद्रकिनारी  'श्रीवल्ली' (Srivalli) या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ संदीप पाठकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. "मी सध्या कोकणात श्रेयस सोबत 'आपडी थापडी' सिनेमाचं शुटींग करतोय, पुष्पा सिनेमात त्याने अल्लू-अर्जुनला जो आवाज दिला आहे तो कमाल आहे, ती फिल्म हिदींत हीट होण्यामागे श्रेयसचं खूप मोठं Contribution आहे. तो सेटवर असताना पुष्पा च्या गाण्यावर रील करायचा मोह कुणाला नाही होणार, मलासुध्दा झाला." असे त्याने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.

त्यांचा हा व्हिडिओ (Srivalli) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर एकाने कॉमेंट केली आहे की, हिंदीत भारी होताच हा चित्रपट. मराठीमध्ये तर अजून भारी बनेल. मराठीमध्ये पण रावडी होईल चित्रपट.

हेही वाचलतं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news