Allu Arjun wife : अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीदेखील इतकी सुंदर, भल्याभल्या अभिनेत्रींना टाकलंय मागे

allu arjun and sneha reddy
allu arjun and sneha reddy
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

'पुष्पा… फूल नहीं, फायर हूं मैं, झुकूेगा नहीं'.. हा डायलॉग सगळीकडे पाहायला मिळतो आहे. फेसबुक असो इन्स्टाग्राम सगळीकडे पुष्पाची गाणी आणि डायलॉग्जचा बोलबाला आहे. 'पुष्पा' म्हणजेच अल्लू अर्जुनचे सर्वच दिवाने झाले आहेत. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राईज'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करून लोकांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटामुळे या चित्रपटातील सर्वांचे कौतुक होत आहे. चित्रपटातील गाणी असो वा डायलॉग्जची सगळीकडे चर्चाचं चर्चा आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. यामध्ये अल्लू आपल्या कुटुंबासोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतो आहे. यामध्ये त्याची पत्नी स्नेहा रेड्डी दिसतेय. (Allu Arjun wife) अल्लू अर्जुनच्या पत्नीविषयी तुम्हाला फार कदाचित माहिती नसेल. जाणून घेऊया अल्लू अर्जुनच्या सुंदर पत्नीविषयी…(Allu Arjun wife)

मध्यंतरी, स्नेहा रेड्डीने इन्स्टाग्रामवर गोवा व्हेकेशनचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये हॉटेल, बीच आणि सुंदर स्नेहाचा जादू पाहायला मिळाला होता.

अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासोबत काही दिवसांपूर्वी गोव्याहून परतला आहे. पण, सोशल मीडियावर अद्यापही त्याची पत्नी स्नेहा रेड्डीचा जलवा पाहायला मिळतो. स्नेहा रेड्डीने गोव्यातील काही फोटो आणि व्हिडिओ व्हिडिओ शेअर केले आहेत.

या व्हिडिओमध्ये गोवा व्हेकेशनची झलक दिसते. ज्यामध्ये स्नेहा अल्लू आणि मित्रांसोबत पोज देताना दिसते. व्हिडिओमध्ये हॉटेल, बीच आणि सुंदर स्नेहाचं सौंदर्य पाहायला मिळतं.

अल्लू अर्जुन प्रमाणेच त्याची पत्नी स्नेहा रेड्डीदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ६.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. स्नेहा इन्स्टाग्रामवर आपल्या फॅमिलीचे नेहमी फोटो शेअर करते.

अल्लू अर्जुन अभिनेता चिरंजीवीचा पुतण्या आहे. अल्लू अर्जुनच्या फॅमिलीतील खूप सारी मंडळी साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार्स आहेत. राम चरण, वरुण तेज, निहारिका ते साई धरमसह सर्व कलाकार प्रसिध्द आहेत.

अल्लू अर्जुनने 'गंगोत्री' चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्याला इंडस्ट्रीमध्ये आर्या या चित्रपटातून फॅन्सचं भरभरून प्रेम मिळालं. यानंतर धमाकेदार चित्रपटांचा सिलसिला आजपर्यंत कायम आहे. अल्लूने ६ मार्च, २०११ रोजी साऊथच्या प्रसिध्द उद्योगपतीच्या मुलीशी म्हणजेच स्नेहा रेड्डीशी लग्न केलं. स्नेहा-अल्लूला दोन मुले – अयान आणि अरहा आहेत.

स्नेहा रेड्डी एखाद्या अभिनेत्रीपेक्षा दिसायला कमी नाही. ती ग्लॅमरस असून लक्झरी लाईफ जगते. तिने अमेरिकेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. स्नेहाने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलीय. तिचे वडील हैदराबादमधील एक प्रसिध्द बिझनेसमॅन आहेत.

एका रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डीची भेट एक फ्रेंडच्या लग्नात झाली होती. स्नेहाला पाहून अल्लू अर्जुनला तिच्याशी प्रेम झालं. स्नेहा एक बिझनेसवुमन देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news