Kacha Badam : एका व्हिडिओने शेंगदाणा विक्रेत्याला स्टार बनवलंय; जाणून घ्या कोण आहे ”Kacha Badam’ चा गायक

Kacha Badam : एका व्हिडिओने शेंगदाणा विक्रेत्याला स्टार बनवलंय; जाणून घ्या कोण आहे ”Kacha Badam’ चा गायक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Kacha Badam)आपल्या देशात कधी कोणाला प्रसिध्दी मिळेल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रानू मंडल प्रसिध्द झाली होती. तर 'बचपन का प्यार' वाला सहदेव रातोरात स्टार झाला होता. सध्या सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' हे गाण ट्रेडिंगवर आहे. इन्स्टाग्रामवर तर अनेकजणांनी या गाण्यावर रिल बनवले आहेत. हे गाण गाणारे भुबन बादायकर चांगलेच फेमस झालेत. भुबन हे शेंगदाणा विक्रेते आहेत.

भुबन सायकलवरुन चणे, शेंगदाणे विकतात

बंगाली भाषेत काचा बदाम म्हणजे कच्चे शेंगदाणे. भुईमुगाला बंगालीत बदाम म्हणतात. हे शेंगदाणे भुबन मोठा आवाज करुन माल विकतात; पण भुबन बादायकर शेंगदाणे विकण्यासाठी गाणी गाऊन ग्राहकांना आकर्षित करतात. लोकांना त्यांची स्टाइल आवडली आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Kacha Badam)

पश्चिम बंगालचे शेंगदाणे विकणारे भुबन बादायकर यांनी स्वत: 'काचा बादाम' गायले आहे. हे गाण बंगालच्या आदिवासी लोकगीतावरील धुनवर आधारित आहे. भुबन बंगाच्या बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी या गावातील मधील आहेत. (Kacha Badam)

भुबन यांच काचा बादाम हे गाण व्हायरल होण्याअगोदर त्यांचे शेंगदाणे रोज ३ ते ४ किले विकले जायचेत. आता त्यांच काचा बादाम हे गाण व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या शेंगदाण्याची विक्री वाढली आहे. पत्नी, तीन मुले असा भुबन यांचा परिवार आहे.

संपूर्ण देश भुबन यांच्या आवाजाचे चाहते झाले आहेत. जगभरातील लोक त्यांच्या गाण्यांवर रील बनवत आहेत. मात्र त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. या संभाषणात भुबन म्हणाले की, 'माझ्या गाण्याबद्दल लोकांना माहिती व्हावी आणि सरकारने माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी. (Kacha Badam)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uma meenakshi (@yamtha.uma)

हेही वाचलत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news