पुढारी ऑनलाईन डेस्क
कर्नाटकमधील हायटेक सिटी अशी ओळख असणार्या बंगळूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील २५ वर्षीय तरुणाने पॉर्न पाहण्यासाठी एका पॉर्न वेबसाईट ओपन केली. मात्र येथे स्वत:चा गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ असल्याचे पाहून तो हादरुनच गेला. गर्लफ्रेंडबरोबर एका हॉटेलमध्ये गेले असताना हा व्हिडीओ असून तो अपलोड करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी तक्रार त्याने दिली आहे. आता सायबर पोलीस हा व्हिडीओ अपलोड करणार्या शोध घेत आहेत.
संबंधित तरुण हा बेंगळूरमधील एका बीपीओमध्ये काम करतो. काही दिवसांपूर्वी तो पूर्व बंगळूरमधील एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत केला होता. येथील रुममध्ये दोघांनी काही वेळ व्यतित केला. त्यांच्या 'खासगी' क्षणांचा व्हिडीओ काहींनी गुप्त कॅमेर्याने टिपला. हाच व्हिडीओ पॉर्न बेबसाईटच्याव वेगवेगळ्या साईटवर अपलोडही केला.
२१ जानेवारी रोजी या तरुणाने पॉर्न पाहण्यासाठी वेबसाईट ओपन केली. त्यावेळी त्याला स्वत:चा गर्लफ्रेंडसोबतचा
व्हिडीओ त्याला दिसला. हा व्हिडीओ पाहून तरुण हादलाच. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने थेट पोलिस
स्टेशनला धाव घेतली.
या पॉर्न व्हिडीओमध्ये दिसत असणारे तरुण-तरुणीचे चेहरे फुसट करण्यात आले आहेत. तरीही शरीरावरील
जन्मखुणांवरुन हा आपलाच व्हिडीओ असल्याचा दावा या तरुणाने केला आहे, असे पोलिसांनी साांगितले. हा व्हिडीओ छुप्या पद्धतीने रेकॉर्ड झालेलाच नाही. कारण व्हिडीओ हा वेगवेगळ्या अँगलमधून चित्रीत झाला आहे. आता आम्ही व्हिडीओ चित्रीत करणार्या आणि तो वेगवेगळ्या पॉर्नसाईटवर अपलोड करणार्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच हा व्हिडीओ अपलोड करणारा सापडला तर मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचलं का?