Hindustani Bhau : कोण आहे हा हिंदुस्तानी भाऊ? 

Hindustani Bhau : कोण आहे हा हिंदुस्तानी भाऊ? 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हजारोंच्या संख्येने नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी दहावी-बारावी परीक्षा ऑनलाईनच घेण्यात यावी, ही मागणी घेऊन हिंदुस्तानी भाऊच्या (Hindustani Bhau) सांगण्यावरून रस्त्यावर उतरली आहेत. हे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांच्या डोक्याला नसता ताप झाला आहे. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून विद्यार्थ्यांना हुसकावून लावलेले. पोलीस सध्या हिंदुस्तानी भाऊच्या शोधात आहेत. तर हा हिंदुस्तानी भाऊ नेमका कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय आहे? त्यांना आतापर्यंत काय केलं आहे? या प्रश्‍नाची उत्तरे आपण जाणून घेवूया…

हिंदुस्तानी भाऊचं (Hindustani Bhau) खरं नाव विकास जयराम पाठक आहे. सोशल मीडियावरील सर्वांत जास्त व्हायरल होणारा त्याचा चेहरा आहे. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर तो आपली मत व्हिडिओमधून व्यक्त असतो.  मध्यंतरी तो हिंदी बीग बाॅसमध्ये सहभागी झाला होता. त्यात तो विजेता ठरला नसला तरी लोकांच्या मनात त्याने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

जनसत्तेच्या एका रिपोर्टनुसार हिंदुस्तानी भाऊ हा मराठी कुटुंबातून पुढे येतो. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे वयाच्या सातव्या वर्षी त्याला हाॅटेलमध्ये वेटरची नोकरी करावी लागली होती. त्याचबरोबर तो घराघरांत जाऊन अगरबत्तीची विक्रीही करत होता. काही जण असं सांगतात की, त्‍याने एका  वृत्तपत्रात नोकरी केलेली होती. क्राईम रिपाेर्टर म्‍हणून त्‍याने पत्रकारितेमध्ये स्वतःची ओळख तयार केली होती.

हिंदुस्तानी भाऊला २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट मुख्य क्राईम रिपोर्टरचा पुरस्कार मिळाला होता. २०१४ मध्ये त्याने युट्यूब चॅनेल काढले. त्यातून त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. त्याचा प्रचंड प्रसिद्ध मिळू लागली. तो आपल्या चॅनेलवरून अभिनेता संजय दत्तची मिमिक्री करत होता. त्याचबरोबर पाकिस्तानच्या कुरापतीवरून शिवराळ भाषेत टीकाही करत होता. आता पाकिस्तानवर तो टीका करतो. पाकिस्तान विषयावरील त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

हिंदुस्तानी भाऊ चर्चेत येणाचं कारण म्हणजे त्याने पहिल्यांना देशद्रोही लोकांच्या विरुद्ध थेट शिवराळ भाषेत टीका करणारा व्हिडिओ पोस्ट केलेला होता. तो प्रचंड व्हायरल झाला. स्वतःच्या चारचाकीत बसून व्हिडिओ करणं त्याचं वैशिष्ट्य आहे. यातून त्याला प्रसिद्ध मिळाली. सध्या त्याच्यावर मिम्सदेखील मोठ्या प्रमाणात बनविले जातात. युट्यूब चॅनेलवरून हिंदुस्तानी भाऊ जवळ जवळ वर्षाला ४०-५० लाख  कमवतो, असे मानले जाते.

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news