Tejasswi Prakash : बिग बॉसमध्ये तेजस्वी ‘या’ ५ वादांमुळे राहिली चर्चेत | पुढारी

Tejasswi Prakash : बिग बॉसमध्ये तेजस्वी 'या' ५ वादांमुळे राहिली चर्चेत

पुढारी ऑनलाईन

तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) बिग बॉस १५ ची सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होती. तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास शानदार आहे. तिने खूप चांगल्या पध्दतीने सर्व टास्क खेळले आहेत. (Tejasswi Prakash)

बिग बॉस १५ मध्ये तेजस्वी लोकप्रिय तर झाली पण, यादरम्यान ती अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे. याच कारणाने ती खास चर्चेत राहिली होती.

कुणाकुणाला भिडली तेजस्वी

तेजस्वी प्रकाशचा वाद तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा ते उमर रियाज पर्यंत पोहोचला. इतकचं नाही तर शमिता शेट्टीसोबतही ती भिडली. तिला आंटी म्हटल्याने घरात तेजस्वी आणि शमिता यांच्यात जोरदार राडा झाला.

शमिता शेट्टीसोबत वाद

शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात अनेकदा भांडणे पाहायला मिळाली आहेत. तेजस्वीने शमिता शेट्टीला आंटी म्हणून तिला धक्का दिला. यावर शमिताच्या सपोर्टमध्ये बिपाशा बासू आणि शिल्पा शेट्टी देखील उतरल्या. सर्वांनी तेजस्वीला एज शेमिंगवरून सुनावलं.

करण कुंद्रा-तेजस्वीचं भांडणं

बिग बॉस १५ मध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वीचा रोमान्स सुरू झाला. अनेकदा दोघांमध्ये जोरदार भांडणेदेखील झाली. पण, पुन्हा एकदा दोघांमध्ये इताका वाद वाढला की. दोघे चांगलेच चर्चेत राहिले.

काय म्हणाली तेजा?

अनेकदा करण कुंद्रावर आरोप करण्यात आला की, तो त्याच्या गर्लफ्रेंडला सपोर्ट करत नाहीत. यावर तेजस्वी म्हणाली की, हे तिचं खासगी प्रकरण आहे.

उमर रियाज आणि तेजस्वीचा वाद

करण कुंद्रा आणि उमर रियाज या शोमधील चांगले मित्र ठरले आहेत. करणमुळे तेजाची मैत्री उमरशी झाली होती. उमरने शोमध्य़े म्हटलं होतं की, तजस्वीचा ॲटिट्यूड त्याला अजिबात आवडत नाही.

प्रतीक आणि तेजस्वी

प्रतीक सहजपालसोबत तेजस्वीचा वाद पाहायला मिळाला. सायकलवाल्या टास्कमध्ये प्रतीकवर तेजस्वीने गंभीर आरोप केला होता. हा आरोप ऐकून प्रतीक रडू लागला. तो म्हणाला की, हा टास्क ती चुकीच्या पध्दतीने सादर करत होते.

रश्मी देसाई आणि तेजस्वी चांगल्या मैत्रीणी आहेत. पण, अनेकदा दोघींमध्ये वाददेखील झाला आहे. करणने समजूत काढल्यानंतर दोघी एकत्र बसून पुन्हा बोलताना दिसल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

Back to top button