आंबेगाव : सरकारी बाबूनीच खाल्लं शेत; भूसंपादनाच्या नावानं लाखोंचा गंडा

आंबेगाव : सरकारी बाबूनीच खाल्लं शेत; भूसंपादनाच्या नावानं लाखोंचा गंडा

दिगंबर दराडे, पुढारी वृत्तसेवा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात दिवसाढवळ्या भूसंपादन घोटाळा सुरू आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड ते सिन्नर रस्त्यासाठी सध्या भूसंपादन सुरू असून बोगस लाभार्थी दाखवून सरकारचे मोजणी अधिकारी, भूसंपादन अधिकारीच सरकारला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

आंबेगाव येथील मौजे कळंब गावातील 13,900 चौरस मीटर जागा महामार्गासाठी संपादित करण्यात आली. त्यापोटी रंगनाथ पांडुरंग कानडे यांना 1100 चौरस मीटर जागेसाठी ३६ लाख ३४ हजार २७० रुपये मोबदला देण्यात आला. तर शंकर पांडुरंग कानडे यांना ९५० चौरस मीटर जागेसाठी ३१ लाख ३८ हजार ६९४ रुपये मोबदला दिला गेला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे महामार्गाच्या भूसंपादनात त्यांची एक इंचही जमीन संपादित झालेली नाही. याउलट बबन कानडे आणि गणेश कानडे या दोघा शेतकऱ्यांची जमीन महामार्गासाठी घेतली आहे. मात्र, त्यांना अद्याप कवडीचाही मोबदला मिळालेला नाही.

ज्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांनी सरकार दरबारी तक्रारी केल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. आंबेगावचं भूमी अभिलेख कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बोगस लाभार्थ्यांशी साटंलोटं करून लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याचा आरोप आता होतोय. या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जातेय.

डॉ. सुहास कहडणे, अध्यक्ष, शेतकरी बचाव कृती समिती

अलिकडेच याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली, तेव्हा अन्याय झालेल्या शेतकऱ्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला. याबाबत भूमि अभिलेख उप अधीक्षक लवकरच आपला अहवाल सादर करणार आहेत.

– जगदीश साळवे, उपअधीक्षक, भूमिअभिलेख

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news