Deepika Padukone : दीपिका म्हणते ‘म्हणून’ मी इंटिमेट सीन्स गहराईयाँ मध्ये केले ! | पुढारी

Deepika Padukone : दीपिका म्हणते 'म्हणून' मी इंटिमेट सीन्स गहराईयाँ मध्ये केले !

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दीपिका पदुकोणचा ( Deepika Padukone ) ‘गहराईयाँ’ हा सिनेमा पुढील महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाचे आणि टिझरची मोठी चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या दरम्यान असणाऱ्या इंटिमेट सिन्सची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. पण या चर्चांचे दीपिकाने समर्थन केले असून चित्रपटातील कथानकाची ती गरज होती असे म्हणत चित्रपटातील अशा सीन्सचे तिने समर्थन केले आहे.

दीपिकाने ( Deepika Padukone ) आपल्या हिमतीवर चित्रपट सृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शिवाय तिने अनेक सुंदर आणि उत्कृष्ट सिनेमे रसिकांना दिले आहेत. तिच्या कामामध्ये अनेक वेळा तिचा अभिनयाचे विशेष कौतुक केले गेले आहे. सध्या ती गहराईयाँ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पुढील महिन्या हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन स्ट्रीमिंग केले जाणार आहे. सध्या या चित्रपटातील दृश्यांची मोठी चर्चा होत आहे. पण याबाबत दीपिकेने खुलासा केला की, हि दृष्ये दर्शकांची एक्साइटमेंट वाटण्यासाठी चित्रित झाली नाहीत तर ती कथानकाच्या मागणी नुसार व गरजे नुसार घेतली गेली आहेत.

या चित्रपटात दीपिका पदुकोण ( Deepika Padukone ), अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले आहे. हा चित्रपट सध्याच्या नातेसंबधांवर भाष्य करणारा आहे. एका इंग्रजी माध्यमास मुलाखत देताना दीपिका या चित्रपटातील आपल्या भूमिके विषयी म्हणाली, मी याला वयाशी अथवा लिंगाशी जोडत नाही. यामध्ये जे काही घडत आहे, ते अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिकपणे घडत आहे. त्यामुळे ती गोष्ट बरोबर आहे.

युवा दिग्दर्शक शकुन याने खूपच चांगल्या पद्धतीने या चित्रपटास बनवले आहे. त्याने अशा गोष्टी करण्यासाठी दबाव टाकला नाही. खरंतर आपणाला काम करताना आणि कथानक वाचतान आपोआप कळते की, याच्यासाठी कशाची गरज आहे. आज जी चर्चा सुरु आहे की, खूपच इंटिमेट सीन्स आहेत, सिनेमा अधिक बोल्ड वाटतो. तर ते तसेच नाही. उगीच जाणून बुजून प्रेक्षकांना गुंतवुण ठेवण्यासाठी त्यांचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी दिग्दर्शक तसे करुन घेत असता. तर त्याला माझ्या सारख्या कलाकारान निश्चितच विरोध केला असता. पण, दिग्दर्शकाने याबाबतीत कोणताही दबाव टाकला नाही. चित्रपटाच्या कथानकची ती नैसर्गिक गरज होती आणि कोणताही दबाव अथवा अवघड न वाटता ते अत्यंत नैसर्गिकपणे चित्रीत करण्यात आले आहे. खरंतर दिग्दर्शकांनी कोणताही संकोच न ठेवता सर्व कलाकारांकडून चांगले काम करुन घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button