BB15 : सलमान म्हणाला, ‘हा तुमचा बेवडा जावई’; पण, तेजस्वीच्या आईची करणलाच पसंती | पुढारी

BB15 : सलमान म्हणाला, 'हा तुमचा बेवडा जावई'; पण, तेजस्वीच्या आईची करणलाच पसंती

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी व्हर्च्युअल कॉलच्या माध्यमातून तेजस्वीच्या आई-वडिलांची भेट घेतली. हे घडवून आणलं ते बिग बॉसचा होस्ट सलमान खानने. व्हर्च्युल कॉलमध्ये सलमान म्हणाला, तुम्ही कसे आहात? जावई पसंत पडला का? यावर तेजस्वीची आई म्हणाली, जावई आवडला. करण कुंद्रा म्हणाला, काका-काकू तुमच्याशी बोलून बरं वाटलं.

 

तेजस्वीची आई तिला म्हणाली, तेजस्वी तुम्ही खूप छान खेळत आहात. करण तू सुध्दा एकमेकांना चांगल्या पध्दतीने पाठिंबा देत आहेस. हे पाहून खूप चांगलं वाटलं. करण म्हणाला, काका बसूया. तेजस्वीचे वडील म्हणाले, ये, खंबा खोलेंगे.

सलमानला हसू आवरलं नाही. तो म्हणाला-हा तुमचा बेवडा जावई. तेजस्वीचे आई-वडीलदेखील हसू लागले. त्यांनी तेजस्वी-करणचं रिलेशनशीप मान्य केलं.

bb15 : तेजस्वी प्रकाश
bb15 : तेजस्वी प्रकाशचे आई-वडील

तेजस्वीने शमिताला आंटी म्हटल्याने भडकली बिपाशा

बिग बॉसचा फिनाले जवळ येत आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात गोंधळ सुरू असलेला दिसला. या सीझनच्या शेवटच्या टास्क दरम्यान, पुन्हा एकदा शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांशी भिडताना दिसल्या. टास्कदरम्यान तेजस्वीने शमिताला आंटी म्हणून हाक मारली. तिचं हे वागणे शमिताला अजिबात आवडलं नाही. त्यामुळे दोघांच्यामध्ये जोरदार वाद झाला.

दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासु शमिताच्या समर्थनार्थ उतरली. तेजस्वीच्या या वागण्यावर बिपाशाने फटकारले.
बिपाशा बासुने ट्विट करून आपली प्रतिक्रिया मांडली. तिने लिहिलं, ‘कोणाला एज शेमिंग केल्यानंतर सॉरी न म्हणणं खरचं दयनीय आहे. जर असे लोक कुणासाठी विजेता वा रोल मॉडल आहे, तर हे वास्तवमध्ये दु:खद आहे.’ तिने पुढे लिहिलंय की-‘जर तुम्ही इनसिक्योर फील करत आहात तर दुसऱ्या मुलींचा अपमान करण्याऐवजी आपल्या व्यक्तीला प्रश्न करा, कारण तोचं तुम्हाला इनसिक्योर फील करत आहे.’

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

Back to top button