sonalee kularni photo : सोनालीने अशी साडी नेसली की, कंबर… | पुढारी

sonalee kularni photo : सोनालीने अशी साडी नेसली की, कंबर...

पुढारी ऑनलाईन : मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kularni photo) ’झिम्मा’ आणि ‘पांडू’ हा चित्रपटाला चाहत्यांचा खूपच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तिची केळीवालीची भूमिका चांगलीच गाजत आहे. तर दुसरीकडे ती नेहमी सोशल मीडियावर चाहत्याच्या संपर्कात राहून अपडेट देत असते. सध्या तिचा आणखी एक साडीतील लूक व्हायरल होत आहे.

सोनाली कुलकर्णीने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर काही साडीतील फोटो (sonalee kularni photo) शेअर केले आहेत. यावेळी तिने पोपटी रंगाच्या फुलांची डिझाईन असणाऱ्या साडी परिधान केली आहे. यासोबत तिने त्याच रंगाचे स्लिव्हलेस ब्लॉउज परिधान करत आपले केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांच्‍या पसंतीस उतरला आहे.

या फोटोला सोनालीने ‘झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले, साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे’ असे कॅप्शन दिलंय. आपल्या सौंदर्याची भूरळ घालत सोनालीने फोटोत वेगवेगळी पोज दिली आहे. यातील खास म्हणजे, या फोटोशूटवेळी सोनालीच्या गळ्यातील मंगळसुत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘तू खूपच छान दिसतेस’, दुसऱ्या एका युजर्सने ‘क्यूट’, ‘सुंदर’ ‘अप्रतिम’, ‘ग्लॅमरस’, ‘खूप सुंदर लुक’ असे म्हटले आहे. या फोटोला चाहत्यांसोबत मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील हास्याचा ईमोजी शेअर करत सोनालीचे कौतुक केलं आहे.

याआधी सोनालीने काही दिवसापुर्वी पती कुणालसोबत नववर्षाचं स्वागत झक्कास करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. याशिवाय तिने निसर्गरम्य ठिकाणीचे देखील फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आत्तापर्यंत तिने मराठीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या वर्षी २०२१ मध्ये सोनाली आणि कुणालने दुबईत विवाहबंधनात अडकली होती.

हेही वाचलंत का?

Back to top button