कॅटरीना कैफची मालदीववारी, एका स्माईलवर चाहते फिदा | पुढारी

कॅटरीना कैफची मालदीववारी, एका स्माईलवर चाहते फिदा

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif) ने आपल्या सुंदर हास्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. मालदिवमध्ये शूटिंगदरम्यान व्हेकेशन एन्जॉय करत असलेल्या कॅटरीनाने सुंदर फोटोजची एक सीरीज शेअर केली आहे.

नुकताच ती मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यामुळे ती नेमकी कुठे चालली होती, या प्रश्नाचं उत्तर आता चाहत्यांना मिळालं आहे. कॅट सध्या मालदिवमध्ये आहे. आपले लेटेस्ट पोस्टमध्ये तिने खुलासा केला आहे की, ती मालदीवमध्ये शूटिंग करत आहे. तिने ‘आनंदी ठिकाण’ अशी कॅप्शन देऊन आपले फ्रेश फोटोज शेअर केले आहेत.

कॅट सध्या मालदीवमध्ये आहे. तिने आपल्या फोटोंनी लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. कॅटने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर ग्लॅमरस फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज अभित गिडवानीने क्लिक केले आहेत. तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये #myhappyplace अशी कॅप्शन दिलीय.

समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाज

फोटोजमध्ये कॅट कूल आणि सुंदर दिसतेय. स्टार बिकिनी टॉप आणि प्रिंटेड शॉर्ट्सवर प्रिंटेड व्हाईट शर्ट तिने घातला आङे. मोकळ्या केसांनी तिचे सौंदर्य आणखी बहरले आहे. कॅटने कॅमेरा पोझसाठी वेगवेगळ्या अँगल दिले आहेत. तिचे हास्य सर्वांचे लक्ष वेधू घेत आहे.
मालदीवमध्ये विक्की कौशल आणि कॅट हनीमूनसाठी गेले होते. त्यानंतर ती शूटसाठी गेली. कॅट मागील आठवड्यात मध्य प्रदेशमध्ये विक्कीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करून मुंबईत परतली होती. तर विक्की तेथे सारा अली खानसोबत शूटिंग करत आहे.

‘मेरी क्रिसमस’चे शूटिंग करेल कॅट

कॅट लवकरचं विजय सेतुपतिसोबत मेरी क्रिसमसचे शूटिंग सुरू करेल. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट ख्रिसमस सणाला २०२२ मध्ये रिलीज होमार आहे. याशिवाय ती टायगर-३ मध्ये सलमान खान आणि इमरान हाशमीसोबत दिसणार आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत ‘फोन भूत’ मध्येही ती दिसेल.

हेही वाचलं का?

Back to top button