varun-natasha wedding anniversary : वरुण- नताशाच्या लग्नाचा अल्बम पाहिला का? | पुढारी

varun-natasha wedding anniversary : वरुण- नताशाच्या लग्नाचा अल्बम पाहिला का?

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल (varun-natasha wedding anniversary) यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मागील वर्षी २४ जानेवारीला हे कपल लग्नबंधनात अडकले होते. पहिल्या ॲनिव्हर्सरीला वरुणने आपल्या फॅन्सना मोठं गिफ्ट दिलं आहे. (varun-natasha wedding anniversary)

वरूण आणि नताशाच्या लग्नावेळी त्यांचे अन्य फोटोज पाहायला मिळाले नव्हते. पण, ॲनिव्हर्सरीवर ओवरएक्सायटेड वरुणने वेडिंग अल्बम शेअर केला आहे.

वरुण आणि नताशाची ही पहिली वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. वरुणने आपल्या लग्नातील खूप सारे फोटो शेअर केले आहेत. सात फेरे घेतानाचे दोघांचे अनेक फोटो या अल्बममध्ये आहेत.

वरुण आणि नताशा यांची लव्ह स्टोरी त्यावेळी खूप चर्चेत राहिली होती. दोघांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केले होते. पुढे दोघेही एकमेकांच्या कुटुंबीयांना भेटून लग्नाचा निर्णय घेतला होता.

वरुण धवन बॉलीवूड अभिनेता आहे तर नताशा दलाल एक फॅशन डिझायनर आहे. लग्नाआधी दोघे अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले होते.


लग्नावेळी दोघांचे फोटो समोर आले होते. पण, आता त्यांच्या खूप साऱ्या फोटोंनी फॅन्सची उत्सुकता वाढवली आहे.

वरुणने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की एक. या शब्दानंतर फॅन्स अनेक अर्थ लावत आहेत. वरुणने साखरपडा, हळदी सेरेमनी आणि लग्नासहित अनेक फोटो शेअर केले आहेत. आता फॅन पेजवरदेखीस हे फोटो व्हायरल होत आहेत.

कमेंट बॉक्समध्ये सेलेब्रिटीज वरुणला शुभेच्छा देत आहेत. लाखों फॅन्सदेखील त्याच्या वेडिंग अल्बममधील फोटो पाहून शुभेच्छा देत आहेत. वरुणच्या या फोटोजना काही मिनिटांमध्ये लाखों लाईक्स मिळाले आहेत.

Back to top button