गायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर अडकले विवाहबंधनात, पाहा खास क्षण | पुढारी

गायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर अडकले विवाहबंधनात, पाहा खास क्षण

पुढारी ऑनलाईन डेस्क

सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे खास क्षणांचे फोटो इन्स्टावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीचं त्यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी आपापल्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे काही  निवडक फोटो शेअर केले होते.

जुईलीनेही आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिलंय- ‘Forever.♾💜’

काही दिवसांपूर्वी जुईलीचे हळदी-कुंकू समारंभाचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यापूर्वी लग्नाआधीच्या पूजेच्या विधींना सुरूवात झाली होती. जुईलीची ग्रहमख पूजादेखील पार पडली होती. या सर्व समारंभाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
जुईली आणि रोहित गेल्या काही दिवसांपासूनंच सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांच्यातील मैत्री, प्रेम सर्वांसमोर दिसत आहे.

गायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर

रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर दोघांनीही एकत्र केलेली पहिला इव्हेंट म्हणत खास फोटो शेअर केला होता. या कॅप्शनसोबत रोहिली आणि सिक्स डेज टू गो असे हॅशटॅग देखील वापरले होते.

गायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर

याआधी रोहित आणि जुईली यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी त्यांचे दोघांचे एकत्र फोटो पोस्ट केलेले दिसताहेत. आता त्यांनी प्री-वेडिंग फोटोशूट, गृहमख सोबतचं साखरपुड्याचेही काही फोटो शेअर केले होते. मराठी कलाविश्वात या दोघांच्या लग्नाची चर्चा होतेय. रोहित-जुईली गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

 

View this post on Instagram

 

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

 

View this post on Instagram

 

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

Back to top button