Sushant Singh Rajput Birth Anniversary : १२ बायोपिक, ३०० कोटींची कंपनी, चंद्रावर जमीन सोडून गेलेला अभिनेता | पुढारी

Sushant Singh Rajput Birth Anniversary : १२ बायोपिक, ३०० कोटींची कंपनी, चंद्रावर जमीन सोडून गेलेला अभिनेता

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडमध्ये एम एस धोनी, केदारनाथ आणि छिछोरे यासारखे चित्रपट देणाऱ्या सुशांत सिंह राजपूतचा आज ३६ वा जन्ममदिवस (Sushant Singh Rajput Birth Anniversary) आहे. सुशांतने घरच्यांचा विरोध डावलून जाईन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. यशाच्या शिखरावर पोहोचला असताना मात्र तो हे जग सोडून गेला. ३०० कोटींची कंपनी, १ स्पेस मुव्ही आणि चंद्रावर जमीन सोडून सुशांतने आपले जीवन संपवले होते. ज्यावेळी आयुष्यात काही गोष्टी असह्य होतात, त्यावेळी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारला जातो. असंच काहीसं सुशांतविषयी झालं. त्याच्या जन्मदिनी त्याला आठवण करत त्याच्याविषयी तुम्हाला माहित नसलेल्या या गोष्टी जाणून घ्या. (Sushant Singh Rajput Birth Anniversary)

एकता कपूरनं सुशांतच्या स्माईलवर फिदा होऊन दिलं होतं काम

पहिलीच मालिका पवित्र रिश्तामध्ये एकता कपूरने सुशांतच्या स्माईलवर फिदा होऊन त्याला मानव देशमुखची भूमिका दिली होती. पण, एकताची क्रिएटिव्ह टीमला सुशांत हा या भूमिकत नको होता. पण, सुशांतला भूमिका मिळाली आणि तो रातोरात स्टार झाला.

पीकेसाठी घेतले नव्हते पैसे

काय पो छे च्या शूटिंग दरम्यान त्याने राजकुमार हिरानीचा चित्रपट पीकेदेखील साईन केला होता. हा त्याचा तिसरा चित्रपट होता. या चित्रपटासाठी सुशांतने पैसे घेतले नव्हते. बदल्यात राजकुमार हिरानी यांनी त्याला भेट म्हणून अनेक पुस्तके दिली होती.

यशराज प्रोडक्शनसोबत साईन केलं कॉन्ट्रॅक्ट

यशराज प्रोडक्शनने सुशांत सोबत तीन चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते. पहिला चित्रपट शुध्द देसी रोमान्स आणि दुसरा चित्रपट डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी होता. कॉन्ट्रॅक्ट अनुसार सुशांतला दुसऱ्या चित्रपटासाठी ६० लाख रुपये मिळणार होते. पण, त्याला १ कोटी रुपये मिळाले. शेखर कपूर दिग्दर्शित तिसरा चित्रपट पानी बंद झाल्यानंतर सुशांतने आपलं कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आणलं. (Sushant Singh Rajput Birth Anniversary)

तीन कंपन्यांचं स्वप्न

२६ एप्रिल २०१८ मध्ये सुशांतने दोन लोकांसोबत मिळून स्वत:ची कंपनी Innsaei Ventures स्थापन केली होती. या कंपनीत सुशांत ३०० कोटींची गुंतवणूक करणार होता. जी नव्या टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार होती.

सुशांत आपल्या या कंपनीच्या माध्यमातून १२ बायोपिकची निर्मिती करणार होता. यामध्ये तो विविध ऐतिहासिक भूमिका साकारणार होता. चित्रपटांमध्ये बिझी असल्याने तो प्रोडक्शनमध्ये फोसकस करू शकला नाही.

सुशांतने तथाकथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक सोबत मिळून २०१९ मध्ये Vividrage Rhealtyx रजिस्टर केलं होतं. या कंपनीच्या नावाचं स्पेलिंग रियाच्या नावे होती.

सुशांतचा अधुरा पवित्र रिश्ता

सुशांत आणि अंकिता लोखंडेची पहिली भेट पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर झाली होती. २०११ मध्ये सुशांतने झलक दिखला जा च्या सेटवर अंकिताला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघे लिव्ह इन मध्ये होते. २०१६ मध्ये त्याने एका मुलाखतीत कन्फर्म केलं की, तो डिसेंबरमध्ये अंकिताशी लग्न करणार आहे. पण, त्याआधी दोघांचा ब्रेकअप झाला.

कृती सेनॉनशी जोडलं गेलं नाव

अंकितानंतर सुशांतंच नाव कृती सेनॉनशी जोडलं गेलं. दोघे नेहमी एकत्र असायचे. दोघे स्वित्झर्लंडलादेखील व्हेकेशन एन्जॉय करायला गेले होते. सुशांतच्या घरच्यांनाही ती भेटायला गेली होती. पण, या दोघांनी आपलं नातं कधीचं समोर आणलं नाही.

रिलेशन, वाद आणि लग्न

सुशांतचं नाव सारा अली खानशीही जोडलं गेलं. सुशांतचं नाव रिया चक्रवर्तीशी तेव्हा जोडलं गेलं, जेव्हा दोघांचे लडाख व्हेकेशनचे फोटोज व्हायरल झाले. पण, दोघांनी आपलं नातं लपवण्यासाठी एकदेखील फोटो शेअर केला नव्हता. पण, एकसारखं बॅकग्राऊंड लोकांच्या नजरेतून सुटलं नाही.

रिया-सुशांतची पहिली भेट

सुशांत-रिया चक्रवर्तीची पहिली भेट २०१३ मध्ये स्टुडिओमध्ये झाली होती. सुशांत त्यावेळी शुध्द देसी रोमान्सचे शूटिंग करत होता. आणि रिया मेरे डॅड की मारुती चित्रपट करत होती. शूटिंगवेळी दोघांच्यात मैत्री झाली. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर सुशांतने २०१५ मध्ये पाली हिल परिसरात पेंट हाऊस खरेदी केले होतं. पेंटहाऊसची किंमत २० कोटी रुपये होती. यश मिळाल्यानंतर सुशांत एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी रुपये घ्यायचा.

सेंट्रो होती सुशांतची पहिली कार

सुशांतच्या कार कलेक्शनमध्ये १.५ कोटींची मसेराटी क्वाट्रोपोर्ट्रो लक्झरी होती. त्याच्याकडे २५ लाखांची बीएमडब्ल्यू K1300R बाईक देखील होती.

सुशांतच्या घरात १२५ हून अधिक पुस्तके होती. यातील खूप सारी भौतिकशास्त्र आणि ग्रहांवरील विषयांची होती.

Back to top button