लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर; अद्याप आयसीयूतच - पुढारी

लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर; अद्याप आयसीयूतच

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे. वयोमानापरत्वे त्यांना या आजारातून बाहेर पडण्यास उशीर होत असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागातच उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांना ११ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. वयोमानानुसार त्यांना या आजारातून बाहेर पडण्यास वेळ लागत आहे, आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, असे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले.

 

Back to top button