समंथाने लग्‍न केलेल्या हॉटेलमध्येच मौनी रॉयचेही शुभमंगल | पुढारी

समंथाने लग्‍न केलेल्या हॉटेलमध्येच मौनी रॉयचेही शुभमंगल

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री मौनी रॉय आणि उद्योगपती सूरज नांबियार हे कपल गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहे. त्यांच्या लग्नाबाबतच्या वावड्या या काळात वारंवार उठल्या होत्या; पण आता दोघेही खरेच लग्न करणार आहेत. आणि त्यांच्या लग्नाला केवळ आठवढाभराचा कालावधी उरला आहे. गोव्यातील आलिशान डब्ल्यू हॉटेलमध्ये 27 जानेवारीला हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. याच हॉटेलमध्ये 2017 मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ-प्रभू आणि नागा चैतन्य यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

तथापि, दोघे नंतर वेगळे झाले. सध्या मौनी आणि सूरजच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. मुंबईत संगीत कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू आहे. या गोव्यातील लग्नानंतर मौनीच्या मूळ गावी पश्‍चिम बंगालमधील कूचबिहार येथेही हे कपल रिसेप्शन देणार आहे. 2019 मध्ये दुबईतील एका पार्टीत या दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीनंतर मौनीच्या कुटुंबीयांना सूरज आवडला होता. सूरजचे आई-वडील रेणुका आणि राजा यांच्यासोबतही मौनीचे चांगले नाते आहे. 23 ते 27 डिसेंबरपर्यंत लग्नाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.

Back to top button