ayushman khurana
ayushman khurana

‘अ‍ॅक्शन हीरो’ लंडनमध्ये होणार चित्रित

Published on

पुढारी ऑनलाईन

अभिनेता आयुष्मान खुराना याला बॉलीवूडमधील चित्रपटांचे न्यू स्कूल मानले जाते. कारण, त्याच्या चित्रपटांचे विषय पारंपरिक नसतात. 'विकी डोनार'पासून ते 'चंदीगड करे आशिकी'पर्यंत त्याच्या चित्रपटांवर नजर टाकली तरी त्याच्या चित्रपटांच्या विषयांचे वैविध्य लक्षात येते. आता आयुष्मान पहिल्यांदाच अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. अर्थात, आयुष्मान भूमिकेसाठी किती मेहनत घेतो ते त्याच्या 'चंदीगड करे आशिकी'मधील शरीरयष्टीकडे पाहून कळू शकते. तर आयुष्मानच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'अ‍ॅक्शन हीरो'. या चित्रपटाचे शूटिंग याच महिन्यापासून लंडनमध्ये सुरू होत आहे. अनिरुद्ध अय्यर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. भारतातही चित्रीकरण होणार आहे; पण या निमित्ताने आयुष्मान पहिल्यांदाच लंडनमध्ये शूटिंग करत आहे. हा चित्रपट स्लीक अ‍ॅक्शन आणि ऑफबीट व्यंगात्मक सेन्स ऑफ ह्युमरद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news