प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार झोंबिवली | पुढारी

प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार झोंबिवली

पुढारी ऑनलाईन

येत्या २६ जानेवारीला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित झोंबिवली चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वैदेही अमेय आणि ललित यांचं त्रिकुट आपल्याला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. झोंबिवली या चित्रपटाची भव्यता आणि झोंबीची पहिली झलक या ट्रेलरमधून दिसून येते.

गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षक मराठीतला पहिला वहिला ‘झोंम कॉम’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत. चित्रपटाचा पहिला टिझर हा फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित झाला होता. या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता तर वाढवली. पण त्याचबरोबर मराठी होत असलेल्या या प्रयोगाला उत्तम दादही दिली.

टीझरनंतर या आलेल्या ‘अंगात आलया’ या गाण्याने अनेकांना आपल्या तालावर नाचवलं आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा हे वर्ष कस मजेशीर सुरू होणार आहे याची जाणीव करून दिली. आता या चित्रपटाचा ट्रेलर आला असून ट्रेलर मध्ये अमेय वैदेही आणि ललित यांच्या सोबत तृप्ती खामकर, जानकी पाठक, राजेंद्र सिरसटकर हे ही कलाकार दिसत आहेत.

ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून त्याची चर्चा ही दर्जेदार सुरू आहे. हा चित्रपट ४ फेब्रुवारी ऐवजी २६ जानेवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मिती संस्था आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतलाय.

Back to top button